🌟पुर्णेतील वैद्यकीय क्षेत्रात डॉ.प्रकाशराव नामदेवराव लोलगे परिवारातील चौथ्या पिढीचे पदार्पण.....!


🌟डॉ.सिध्दांत संजय लोलगे (एमबीबीएस एमडी) यांच्या डायगनोस्टिक सेंटरचे थाटात उद्घाटन🌟 

🌟पुर्णेतील जेष्ठ आरोग्य तज्ञ डॉ.डि.आर.वाघमारे यांच्या हस्तें उद्घाटन सोहळा संपन्न🌟


पुर्णा (विशेष वृत्त - चौधरी दिनेश) - पुर्णा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात जवळपास अर्ध शतकापासून अर्थात पन्नास वर्षांपासून 'रुग्ण सेवा हिच परमेश्वर सेवा' मानून मागील चार पिढ्यांपासून आपल्या कर्तृत्वाची जनसामान्यांच्या हृदयावर छाप पाडणाऱ्या डॉ.नामदेवराव लोलगे यांच्या चौथ्या पिढीने पुर्णा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात डॉ.सिध्दांत संजय लोलगे (एमबीबीएस एमडी) यांच्या रुपाने पदार्पण केले आहे.

पुर्णा/वसमत संयुक्त तालुका असतांना मागील अंदाजे सहा ते सात दशकांपूर्वी स्व.डॉ.नामदेवराव लोलगे यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करीत रुग्णसेवेचा वसा घेऊन 'रुग्णसेवा हिच परमेश्वर सेवा' मानून आपले जिवन वैद्यकीय क्षेत्राला समर्पित केले यानंतर त्यांचें सुपुत्र स्व.प्रकाश नामदेवराव लोलगे यांनी जवळपास पाच दशकांपूर्वी पुर्णा शहरातील महाविर नगर परिसरात लोलगे हॉस्पिटलची सुरुवात करीत शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची आजिवन सेवा केली स्व.डॉ.प्रकाशराव लोलगे यांच्या रुग्णालयात विलाजासाठी जाणारा प्रत्येक रुग्ण डॉ.प्रकाशराव लोलगे यांची पाठीवर थाप पडताच अक्षरशः आपला आजार विसरुन जात असे अत्यंत मयाळू स्वभाव असलेले स्व.डॉ.प्रकाशराव लोलगे यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र डॉ.संजय प्रकाश लोलगे व त्यांच्या सुनबाई डॉ.ज्योतीताई संजय लोलगे मागील तिन/साडेतीन दशकांपासून पुर्णा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात लोलगे परिवाराच्या 'रुग्ण सेवा हिच परमेश्वर सेवा' या मुलमंत्राचा अंगीकार करीत रुग्णांच्या सेवेसाठी आपले जिवन समर्पित करुन रुग्णांची सेवा करीत असतांना मागील वर्षी आदरणीय डॉ.सजय प्रकाश लोलगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

पुर्णा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात आज शुक्रवार दि.०८ डिसेंबर २०२३ रोजी लोलगे परिवारातल्या चौथ्या पिढीतील डॉ.सिध्दांत संजय लोलगे (एमबीबीएस एमडी) यांचे पदार्पण झाले असून त्यांनी आदरणीय स्व.डॉ.संजय प्रकाश लोलगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुर्णा येथील आपल्या लोलगे हॉस्पिटलमध्ये डॉ.लोलगे डायग्नोस्टिक सेंटरची सुरुवात केली असून आज शुक्रवार दि.०८ डिसेंबर रोजी सकाळी १०-३० वाजता जेष्ठ समाजसेवक तथा जेष्ठ आरोग्य तज्ञ डॉ.डि.आर.वाघमारे यांच्या हस्तें व आदरणीय डॉ.ज्योतीताई संजय लोलगे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.लोलगे डायगनोस्टिक सेंटरचे थाटात उद्घाटन करण्यात आले यावेळी पुर्णा तालुका डॉक्टर असोशियनचे अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.

पुर्णा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केलेल्या स्व.डॉ.नामदेवराव लोलगे यांच्या चौथ्या पिढीतील डॉ.सिध्दांत संजय लोलगे एमबीबीएस एमडी रेडिओ डाईगणोसीस असून यापुर्वी डॉ.सिध्दांत लोलगे यांनी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दोन वर्षे तर हरियाणा राज्यातील पाणिपत येथील प्रेम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक वर्ष तर नांदेड येथील भगवती डायग्नोस्टिक सेंटर मध्ये दिड वर्ष तर नवी मुंबईतील फॉटीस हॉस्पिटलमध्ये जेष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून सहा महिने आरोग्य सेवा बजावली असून आपल्या लोलगे परिवाराचा आरोग्य सेवेचा वसा सांभाळत त्यांनी आपली जन्मभूमी असलेल्या पुर्णेतील वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करीत आपल्या लोलगे परिवाराच्या 'रुग्णसेवा हिच परमेश्वर सेवा' या मुलमंत्राची परंपरा कायम राखली आहे.


डॉ.सिध्दांत संजय लोलगे यांच्या पुढील वाटचालीस आमच्या शतशः हार्दिक शुभेच्छा.....

✍🏻विशेष वृत्त - चौधरी दिनेश (रणजित)

मो.9766529055


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या