🌟परभणी येथील कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात माजी विद्यार्थीनी मेळाव्याचे आयोजन.....!


🌟महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त संख्येने मेळाव्यात सहभाग नोंदवावा - प्राचार्य डॉ.वसंत भोसले

परभणी येथील कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी संघाच्या वतीने दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता माजी विद्यार्थीनींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात महाविद्यालय स्थापनेपासूनच्या विद्यार्थीनींचा उस्फूर्त सहभाग असणार आहे. 

तरीही महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त संख्येने मेळाव्यात सहभाग नोंदवून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.वसंत भोसले,माजी विद्यार्थीनी संघाच्या समन्वयक डॉ. संगीता आवचार आणि अध्यक्ष डॉ. मंजूषा याज्ञिक यांनी केले आहे. यावेळी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक व कर्मचारी यांचीही उपस्थिती राहणार आहेत. मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच माजी विद्यार्थीनी संघाच्या नाहीन युसुफजई, प्रणिता रायखेलकर, हर्षा मूलचंदानी, वर्षा भुतडा, तनुजा देशपांडे, वर्षा देशपांडे, प्रतिमा देशपांडे, माधुरी भारस्वाडकर, मंजूषा वडगावकर या मेहनत घेत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या