🌟परभणीत राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाचे उद्या ३१ डिसेंबर रोजी आयोजन.....!


🌟साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून आ.सुरेश वरपूडकर तर उद्घाटक म्हणून कवी संतोष नारायणकर यांचा उपस्थिती🌟

परभणी (दि.३० डिसेंबर) - परभणी शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकरी निवास येथे उद्या रविवार दि.३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन -२०२३ चे आयोजन करण्यात आले असून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी/गायक तथा शाहीर गंगाधर लहाडे तर उद्घाटक म्हणून कवी संतोष नारायणकर तर राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील जेष्ठ कॉंग्रेस नेते माजी राज्यमंत्री आ.सुरेश वरपूडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.


राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाचे २० वे वर्ष असून या साहित्य संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्यातील विकासरत्न लोकप्रिय महिला लोकप्रतिनिधी संसदरत्न खा.फौजीया खान,खासदार संजय बंडू जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील,लोकप्रिय तरुण तडफदार नेतृत्व तथा कॉंग्रेस अनुसुचित जाती विभाग महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष धम्मरत्न डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष ॲड.विजयराव गव्हाणे, परभणी मनपाचे उपमहापौर भगवान वाघमारे,माजी महापौर प्रताप देशमुख,भाजपाचे नेते डॉ.अनिल कांबळे यांची उपस्थिती राहणार असून सत्कारमूर्ती तथा अभिवक्ते म्हणून प्रा.संजय गायकवाड,सुदाम धुपे,प्रा.डॉ.सुशिलप्रकाश चिमोरे,भारत दाढेल तर विशेष व्याख्याते म्हणून महाराष्ट्र राज्य लसाकम सभासद नोंदणी प्रमुख प्रा.डॉ.दयानंद मस्के यांचें सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील तत्वज्ञानाची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान होणार आहे.

या राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनास साहित्यिक तसेच समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीसह लालसेनेचे कॉ.गणपत भिसे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या