🌟दानपरामीतेला बुद्ध धम्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे....!


🌟विपश्यनाचार्य भदंत पय्या रत्न थेरो यांचे प्रतिपादन🌟


पुर्णा : पुर्णा येथील बुद्ध विहारात दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीष पौर्णिमेनिमित्त जाहीर धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो भदंत पयावंश भदंत संघरत्न यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.


याप्रसंगी आपल्या प्रमुख धम्म देशने मध्ये विपश्यना चार्य             पै य्यारत्न थेरो  नांदेड  यांनी बुद्ध धम्मा मधील दानपारमीतेचे महत्व विशद करताना  महान राजे प्रसन्नजीत सम्राट अशोक अनाथ पिंडक सुप्रसिद्ध  आयुर्वेदाचार्य जीवक समस्त नारी जातीसमोर आपल्या दानपारमीतेचा आदर्श ठेवणाऱ्या  आम्रपाली विशाखा यांनी विशुद्ध धम्म आचरन करून मानव जाती समोर आदर्श ठेवला. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या कमाईचा विसावा हिस्सा समाजसेवेसाठी धम्मकार्यासाठी द्यावा अशा प्रकारचा हितोपदेश दिला होता. मार्गशीर्ष पौर्णिमेचा ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद करताना त्यांनी चक्रवर्ती सम्राट अशोकांची सुकन्या संघमित्रा  यांनी श्रीलंका या ठिकाणी     भि क्कुनी झाल्यानंतर अनुराधापुर या ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेला बोधी वृक्षाचे वृक्षारोपण केले होते.दरवर्षी या ठिकाणच्या तीनशे एकर परिसरामध्ये बोधी वृक्षाची पूजा केली जाते.संपूर्ण जगामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी बुद्ध धम्म विचार प्रणाली अंगीकारणे त्यानुसार आचरण करणे संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहे.भदंत डॉ. उपगुप्त महा थेरो यांनी धम्म कार्य करत असताना माना पानाची अपेक्षा ठेवू नये.


त्यांनी चीन या देशांमधील बुद्ध धम्म अनुयायांचे उदाहरण देऊन सांगितले बुद्ध धम्म दर्शन सहलीमध्ये अनेक चिनी उपासक उपासिकांनी आम्हाला दान दिले परंतु त्यांनी त्याचे फोटो सेशन केले नाही.धम्म सहली मधील उपासकांना त्यांनी मज्जाव केला.दान देत असताना त्याचा गाजावाजा होता कामा नये.हे आपण चिनी बौद्ध धर्माकडून शिकलं पाहिजे.हिमायत नगर या ठिकाणी भदंत पयारत्नाथेरो यांना बुद्ध विहारासाठी व विपश्यना केंद्रासाठी रोड लगतची कोट्यावधी रुपयाची जमीन श्रद्धा संपन्न उपासकाने दान दिली.मोठ्या प्रमाणावर धम्मकार्यासाठी लोक दान देत आहेत. धम्मचक्र गतिमान होताना दिसत आहे.

मार्गशीर्ष पौर्णिमेच औचित्य साधून समता सैनिक दलाचे भौ सा तालुका मानवत येथील किरण झोडपे व त्यांच्या पत्नी पूजा झोडपे यांनी गर्भसंस्कार विधीच्या निमित्ताने पूजनीय भिकू संघास ची वरदान फलदान व जीवनावश्यक वस्तूचे दान त्याचप्रमाणे उपस्थितांना भोजनदान दिले.त्यांच्या पोटी जन्म घेणारी कन्या अथवा पुत्र यांना भिकू, भिक्कुनी बनविण्याचा सम्यक संकल्प या प्रसंगी केला.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्रद्धा संपन्न उपासक उपासिका संपूर्ण जिल्ह्यामधून आले होते.

यावेळी प्रमुख उपस्थिता मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड ज्येष्ठ धम्म उपासक अमृत मोरे वा.रा . काळे मुगाजी खंदारे बाबाराव वाघमारे   इंजिनीयर पीजी रणवीर दिलीप गायकवाड पत्रकार विजय ब गाटे मुंजाजी गायकवाड  उद्दोजक गौतम भोळे अतुल गवळी हे होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजिनीयर विजय खंडागळे रामू भालेराव सुरज जोंधळे सोनू काळे राजू जोंधळे बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा धम्म सेवेत कार्यरत असलेली महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या