🌟पुर्णा शहरात आज रविवार दि.१० डिसेंबर रोजी परभणी जिल्हा अजिंक्यपद क्रॉसकंट्री स्पर्धा संपन्न....!


🌟या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून पुर्णा शिक्षण समितीचे उपाध्यक्ष तथा प्रतिष्ठीत व्यापारी आनंद अजमेरा यांची उपस्थिती🌟 


परभणी/पुर्णा (दि.१० डिसेंबर) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहरात आज रविवार दि.१० डिसेंबर रोजी परभणी जिल्हा अथलेटीक  असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या परभणी जिल्हा अजिंक्यपद क्रॉसकंट्री स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाल्या या स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंची राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेत निवड करण्यात आली असून या स्पर्धेचे आयोजन पुर्णेतील मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने करण्यात आले होते.


या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून पुर्णा शिक्षण समितीचे उपाध्यक्ष तथा प्रतिष्ठीत व्यापारी आनंद अजमेरा तर प्रमुख पाहूणे म्हणून पुर्णा तहसिलचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर, दैनिक लोकमत वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी विनायक देसाई,अभिनव विद्या विहार प्रशालेचे प्रशासक दिलीपराव माने राजेश पिडगे आदींची उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी शिवसेना (उबाठा) गटाचे मा.जिल्हा प्रमुख विशाल कदम हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये प्राचार्य अंबादास काळे,वसंत कऱ्हाळे जेष्ठ क्रिडा शिक्षक तथा तालुका क्रिडा संयोजक धरमसिंग बायस, प्रा.सतीश बरकून्टे,रावसाहेब हनवते, प्रा.अब्दुल अन्सार,शिवप्रसाद देवणे आदी मान्यवर उपस्तिथ होते. 



या स्पर्धेसाठी पंच म्हणून जिल्हा अथलेटिक असोसिएशनचे कैलास टेहरे,यमनाजी भालशंकर,संतोष पोले,गंगाधर आव्हाड,अमोल नंद, निलेश काळंके, गजानन भालेराव तर स्पर्धा पायलट म्हणून शंभु गायकवाड,नितीन गवळी,सोनू पवार,सुरेश बगाटे,कुंदन ठाकूर,कुणाल पट्टेकर,आशितोष शिंदे,गोरे अभिलाष,शेख मसूद आदिनी काम पहिले तर स्पर्धा चेक पॉईंट पंच म्हणून आकाश भोसले,मुगाजी सोळंके,किशोर बोकारे,योगेश दळवी,धाराजी सोळंके,महेंद्र गवळी आदिनी काम पहिले असून या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या स्पर्धेकास गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूसाठी श्री. वसंत कऱ्हाळे जेष्ठ क्रीडा शिक्षक यांनी स्वइच्छेने अलपोहाराची व्यवस्था केली.

*16 वर्ष आतील मुले*

प्रथम - सोपान शरद पवार

द्वितीय - अनन्य विनोद जावळे

तृतीय - अदित्य अनंदराव कदम

*18 वर्ष अतील मुले*

प्रथम - वैभव बालाजी तरंगे

द्वितीय - विनय बालासाहेब ढोबळे

तृतीय - प्रतिक सुनिल पवार

*२० वर्ष आतील मुले*

प्रथम - सोमेश्वर अंगद कदम  द्वितीय - कुनाल दिनाजी साबळे तृतीय - पवन विष्णु पवार

*खुला गट मुले*

प्रथम - कैलास नामदेव चव्हाण

द्वितीय -  ज्ञानेश्वर देवराव दुधाने

तृतीय - अर्जुन संतोष कदम

*16 वर्ष आतील मुली*

प्रथम - साक्षी सुधाकर गायकवाड.

द्वितीय - प्रेरणा विश्वनाथ वसमनकर

तृतीय - साक्षी संजय सवराने

*18 वर्ष अतील मुली*

प्रथम - पदमजा बालाजी कोमवार

द्वितीय - राखी भगवान वाव्हळे

तृतीय - सलोनी गोपालसिंग बायस

*२० वर्ष आतील मुली*

प्रथम - सिमा प्रल्हाद गलांडे

 द्वितीय - ऋतुजा शिवचरण जाधव

*खुला गट मुली*

प्रथम - अंकीता विलासराव कदम

द्वितीय -  द्रोपदी विलासराव ढोणे

तृतीय - जनाबाई विठ्ठल लाढाणे

या सर्व विजयी विद्यार्थ्यांची बुलढाणा येथे होणाऱ्या राज्य क्रॉसकन्ट्री स्पर्धे करिता निवड झाली आहे या स्पर्धा प्रा.डॉ.माधव शेजूळ जिल्हा सचिव अथलेटिक असोसिएशन परभणी,प्रा.डॉ.गुरूदास लोकरे, प्राचार्य रणजित काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या अशी माहिती मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक प्रा.डॉ.महेश जाधव यांनी दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या