🌟महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदान शिबीराचे आयोजन करुन अभिवादन....!


🌟नांदेड धम्माश्रय युवा विचार मंच संघटनेचा हृदयस्पर्शी उपक्रम : मागील १५ वर्षापासून रक्तदान शिबीराचे आयोजन🌟 



नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागच्या १५ वर्षांपासून धम्माश्रय युवा विचार मंच यांच्यावतीने महारक्तदान शिबीर राबण्यात येत असून, यंदा शिबिराचे १५ वे वर्षे होते. बुधवार दि.६ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १०० जणांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेबाना अभिवादन केले या वेळी मा.विकास माने ( उपविभागीय अधिकारी, नांदेड ), मा. सुर्यमोहन बोंमलवाड ( पो. निरीक्षक भाग्यनगर,नांदेड ) सोनू दरेंगावकर (जिल्हा  जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कर्मचारी नांदेड ) मा.अरुण दुमल ( पंचायत समिती, नांदेड ) मा. प्रकाश गच्चे,( महापालिका, नांदेड )श्रीमती भारतीबाई सदावर्ते (जेष्ठ समाजसेविका ) शंकर निवडंगे ( प्रभात नगर मा,गा व,स,गृ,संस्था चे चेरमान ) प्रभात नगर येथील जेष्ठ नारगरिक उवस्थित होते दुधमल सर, गोवंदे सर, पंडित सोनाळे सर, विजय भोरगे सर जेष्ठ महिला मध्ये सरपाते बाई, अरुणाबाई पंडित,सुभद्रबाई वाटोरे, भारतीबाई गच्चे यांची उपस्थती होती व सायंकाळी प्रभात नगर येथून पेदन पणती ज्योत अभिवादन रॅली काढल्यात अली त्या वेळी प्रभात नगर येथील सर्व बोद्ध उपासक उपासिका, बालक बालिका,नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप वाटोरे, राहुल सुर्यतळे,संदीप जोंधळे, सुमेध खंदारे,संबोदित कांबळे,किरण गच्चे,संकेत खिल्लारे,अजय थोरात,अनिकेत कदम, सज्जन म्हेत्रे, अविनाश कदम, शंतनू नरवाडे,तुषार खरे,गबर ढोले,चिंटू कांबळे,विजय हणमंते स्वप्नींल बुक्तरे,धम्माश्रय युवा विचार मंच च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.......





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या