🌟प्रधानमंञी आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार्‍या यंञणेची प्रशासनाकडुन हेळसांड....!


🌟विविध मागण्यासाठी सिएलटी संघटनेचे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर🌟

फुलचंद भगत

वाशिम :- प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या तांत्रिक तज्ज्ञांच्या मानधनात मागील पाच वर्षांपासून वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे मानधनात ५० टक्के वाढ करण्यात यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वाशीम जिल्हा सीएलटीसी संघटनेमार्फत दिनांक १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांचे मार्फत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संचालकांना निवेदन दिले आहे.

                   राज्यातील विविध महानगरपालिक, नगरपरिषद, नगरपालिका तसेच नगरपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ही केंद्र शासनाच्या योजना राबविण्यासाठी शहर स्तरीय तांत्रिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सर्वच ठिकाणी स्थापन केलेल्या या कक्षात तांत्रिक तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे.मागील पाच ते सहा वर्षांपासून हे सीएलटीसी तांत्रिक कर्मचारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत. मात्र, त्यांच्या विविध मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्या मागण्या सोडविण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी वाशीम यांना  सीएलटीसी संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले.

*अशा आहेत मागण्या :-

तांत्रिक कक्षात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करावे, इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे या योजनेतील कर्मचाऱ्यांना एचआर पॉलिसी लागू करावी,मानधनात ५० टक्के वाढ करावी, शासकीय भरतीमध्ये आरक्षित राखीव जागा उपलब्ध कराव्या, सर्व कर्मचाऱ्यांचा अनुभव बघता ५८ वर्षांपर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी.आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पांडे,उपाध्यक्ष राजेंद्र अंबोरे,किसन धनकर,गजानन राऊत,किशोर कांबळे,सचिन इंगोले,आशिष तायडे,आकाश मंत्री आदी उपस्थित होते.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या