🌟परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांकरीता हाडाची ठिसूळता तपासणी शिबीर....!


🌟शिबिराचे उद्घाटन परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक रागसुधा आर.यांच्या हस्ते होणार🌟 

परभणी (दि.०२ डिसेंबर) : मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या रविवार दि.०३ डिसेंबर २०२३ रोजी शिवाजी नगरातील डॉक्टर नावंदर हॉस्पिटल मध्ये हाडाची ठिसूळता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

            या शिबीरात शहरातील सर्व पत्रकारांच्या कुटुंबीयांची तपासणी मोफत करण्यात येणार असून शिबिराचे उद्घाटन परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक रागसुधा आर. यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या