🌟परभणी जिल्ह्यातील सेलू येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची दणदणीत जाहीर सभा संपन्न.....!


🌟मराठा आरक्षणाच्या आड येणार्‍यांची नावे जाहीर करणार : मनोज जरांगे पाटील यांचा इशारा🌟 

परभणी/सेलू  : मराठा समाजाच्या आरक्षणा आड येणार्‍या व्यक्तीची आपण वेळप्रसंगी नावे जाहीर करु, असा गंभीर इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवार दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी सेलू शहरात आयोजित केलेल्या जंगी जाहीर सभेतून दिला.


         मराठायोध्दा जरांगे पाटील यांच्या पाचव्या टप्प्यातील दौर्‍यात शुक्रवारी सकाळी सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर दणदणीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस समाज बांधवाची मोठी गर्दी उसळली. या सभेत जरांगे यांनी, मराठा आरक्षण हे आपल्या टप्प्यात आले आहे, असे स्पष्ट करीत या निर्णायक लढाईत सर्वसामान्य समाजबांधवांनी आपल्या पाठीशी भक्कम अशी साथ उभी केली. त्याचाच तो परिणाम आहे, असे नमूद केले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या लढाईत समाजबांधवांनी दिलेल्या योगदानाचे मुक्तकंठाने कौतूक करतेवेळी या संघर्षात काही व्यक्ती आडव्यासुध्दा आल्या. वेळप्रसंगी त्या व्यक्तींची निश्‍चितच नावे जाहीर करु, असा इशारा देवून जरांगे यांनी जो आड येईल त्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही, असाही इशारा दिला.

               करोडोंच्या संख्येने मराठे एकत्र आले, ही लाट आता साधीसुधी नाही, असा टोला राज्य सरकारला लगावते वेळी तुमच्या नोटीसीला घाबरून ही लाट मागे फिरणार नाही, धमक्यांना घाबरत नाही, असे नमूद केले. आम्ही धमक्या देत नसतो. आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. लोकशाहीप्रमाणे लढा सुरु आहे. ही सभा नाही, मराठ्यांची वेदना आहे, असे स्पष्ट करतेवेळी जरांगे यांनी आरक्षणाची 80 टक्के लढाई आपण जिंकलो आहोत, समाजबांधवांच्या जीवावरच, साथीवरच, प्रेमावरच ही लढाई लढली जात आहे. समाजबांधवांनी सुध्दा या निर्णाय लढाईत आता मैदानावर उतरले पाहिजे. आता हटायची वेळ नाही, हे आरक्षण कसे देत नाही ते बघतोच, नोटिसीला आपण घाबरत नाही, आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही, असा इशारा देवून जरांगे यांनी मराठा समाजबांधवांनी सावध रहावे, एकजूट रहावे, अशी संधी पुन्हा येणार नाही, असेही नमूद केले. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या या सभेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. सभेपूर्वी त्यांचे सेलू शहरात आगमन झाले त्यावेळी त्यांचे सेलूतील सकल मराठा समाज बांधवांनी जंगी स्वागत केले. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणले होते. सभास्थळी व संपूर्ण शहरात तसेच मार्गावर भगवे झेंडे मोठ्या डोमाने फडकत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती झाली होती. या सभेस आसपासच्या खेड्यापाड्यातील जनसमुदायाची उपस्थिती लक्षणीय होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या