🌟प.पु.श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा जन्मोत्सवानिमित्त चिखलीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन......!


🌟भव्य जन्मोत्सव सोहळ्या निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर यादरम्यान करण्यात आले🌟

 चिखली : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परमपूजनीय श्री संत खटकेश्वर बाबा संस्थान चिखली येथे भव्य जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर यादरम्यान करण्यात आले आहे. 

    उद्या मंगळवार दिनांक 12 डिसेंबर धनरोजी जगद्गुरु स्वामी विवेकानंद व कर्मयोगी परमपूजनीय श्री संत शुकदास महाराज यांचे पादुकाचे आगमन,दर्शन व सत्कार सोहळा होणार आहे . यावेळी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते, विश्वस्त शशिकांतआप्पा बेंदाडे, शिवचरित्रकार ह .भ. प. गजाननदादा शास्त्री यांच्या हस्ते श्री चे पूजन होऊन या जन्मोत्सवाची सुरुवात होणार आहे .

    शनिवार दिनांक 16 डिसेंबर सकाळी दहा वाजता कलश पूजन, विना पूजन, ध्वजारोहण होईल अकरा वाजता भव्य मिरवणूक. सायंकाळी सहा वाजता श्रीकृष्ण संगीत विद्यालयाचे ह. भ. प भीमराव महाराज पवार शास्त्री यांचे भजन होईल . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक निळकंठ आवटी सर व त्यांचा संच करणार आहे. रात्री 8 वाजता आळंदी देहू येथील संत विचारवंशज ह भ प पांडुरंगशास्त्री शितोळे यांचे श्रीहरी कीर्तन होईल.

    रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कवळा येथील ह .भ. प पुंडलिक महाराज डाळीमकर व बाल भजनी मंडळ कवळा व तांदुळवाडी आणि संच यांचे प्रवचन होणार आहे. यावेळी बाल मृदुंग तबलावादक कुमार शिवम डाळीमकर व कुमार रोहित जाधव यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 2 ते 4 संगीत विशारद ह. भ. प. सौ रेणुकाताई जाधव यांचे प्रवचन. दुपारी 4 ते 5 ह. भ. प. सौ भागवताचार्य पुष्पाताई सुरडकर यांचे प्रवचन होईल. सायंकाळी 6 वाजता आळंदी येथील ह. भ. प. विलासजी खंदारे गुरुजी यांचे प्रवचन  त्यांना मृदंग वादक श्यामजी खंदारे महाराज हे साथ देणार आहेत. त्यानंतर रात्री 8 वाजता आळंदी देवाची येथील ह. भ. प‌ भागवताचार्य संजय महाराज कावळे यांचे श्रीहरी कीर्तन होईल.

   सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता पन्नालाल बगाडिया, सौ नीतादेवी बगाडिया, सुरेशआप्पा खबुतरे, सौ स्नेहलताताई खबुतरे व समर्थ खटकेश्वर बाबा भक्त मंडळाचे वतीने अभिषेक व आरती. त्यानंतर 10 ते 12 पळसखेड सपकाळ येथील ह. भ. प.  परिवाजकाचार्य हरिचैतन्यनंद महाराजांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर दुपारी 2 वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन परमपूजनीय श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा संस्थांचे अध्यक्ष सुरेशआप्पा खबुतरे तथा आर्यनंदी अर्बन परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या