🌟पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथे अंखड हरिनाम सप्ताहास उद्या सोमवार दि.०१ जानेवारी पासून प्रारंभ....!


🌟सप्ताहाची सांगता सोमवार दि.०८ जानेवारी २०२४ रोजी काल्याच्या किर्तनासह महाप्रसादाने होणार🌟

पुर्णा (दि.३१ डिसेंबर) - पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथे अंखड हरिनाम सप्ताहास उद्या सोमवार दि.०१ जानेवारी २०२४ पासुन प्रारंभ होत असुन या सप्ताहाची सांगता सोमवार दि.०८ जानेवारी २०२४ रोजी काल्याच्या किर्तनासह महाप्रसादाने होणार आहे.

तालुक्यातील फुलकळस येथे मागील ३० वर्षा पासून श्री.संत मोतिराम महाराज,मारोतराव महाराज  यांच्या कुपाआशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन दर वर्षी करण्यात येते. सप्ताह कालावधीत दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते १० सामुहिक ग्रथराज ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते ४ श्रीमद भागवतकथा, सायं. ५ ते ७ धुपआरती  व रात्रौ ८.३० ते १०.३० हरि किर्तन व रात्री हरिजागर इत्यादी कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालवधीत भागवतकार ह.भ.प.दत्ता महाराज पुरी हे भागवत कथा सांगनार आहेत.

दि.८ जानेवारी २०२४ सोमवार रोजी गावतुन ग्रथराज ज्ञानोश्वरीची भव्य दिंडी कडण्यात येणार आहे . गुरुवर्य माऊली महाराज मुडेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहची सांगता होणार आहे. सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प.माधव महाराज मिसाळ, विठ्ठल महाराज माने,संतोष महाराज पुरी, तुकाराम आण्णा गव्हाळे हे करणार आहेत. ह.भ.प.नवनाथ महाराज चिखलीकर,बाळासाहेब महाराज कुलकर्णी,प्रभाकर महाराज झोलकर,भगवान महाराज इसादकर,रोहिदास महाराज कळकिकर,शंकर महाराज लोंढे,दत्ता महाराज पुरी,माधव महाराज मिसाळ यांचे कीर्तने होणार आहेत.तर मृदंगाचार्य वैभव  महाराज पांचाळ  आळंदीकर गायकवृंद   पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळीनी साथ असणार आहे . मन्मथ नावकिकर,बळीराम मिसाळ,भीमराव देशपांडे,आरून देशपांडे, मोकिंद साबळे,शिवाजी शिराळे,विठ्ठल शिराळे,हनुमंत मिसाळ यांच्या वतीने दररोज भोजनाच्या पंगतीचे आयोजन केले आहे .सप्ताह सांगता प्रसंगी होणाऱ्या  विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भावीक भक्तांनी घ्यावा असे आव्हान  फुलकळस येथिल नवहनुमान मंदिर भजनी मंडळ यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या