🌟परभणी जिल्ह्यात शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी विकसित भारत संकल्प यात्रा....!


🌟संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या या कल्याणकारी योजनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा - जिल्ह्याधिकारी 

परभणी (दि.18 डिसेंबर) - विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या वंचित लोकांपर्यंत  विविध योजनेचे लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे परभणी जिल्ह्यात 24 नाव्हेंबर, 2023 ते दि. 26 जानेवारी, 2024 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जावून लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांना केंद्र व राज्याच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असुन, नांव नोंदणी करण्यात येणार आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी लाभ प्राप्त करुन घ्यावेत असे अवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

मंगळवार, दि,19 डिसेंबर, 2023  रोजी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील दामपुरी (सकाळ सत्र) आणि पिंपळदरी (दूपार सत्र), पालम तालुक्यातील सिरपुर (सकाळ सत्र) आणि सायळा (दूपार सत्र), परभणी तालुक्यातील नरसापुर (सकाळ सत्र) आणि नागापुर (दूपार सत्र), जिंतूर तालुक्यातील वरुड न. (सकाळ सत्र) आणि वडाळी (दूपार सत्र), मानवत तालुक्यातील पार्डी (सकाळ सत्र) आणि शेवडी (दूपार सत्र) तर सेलू तालुक्यातील गिरगाव खु. (सकाळ सत्र) आणि करडगाव (दूपार सत्र) या गावात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 

यावेळी  सदर यात्रेसमवेत ग्रामपंचायत विभागाचे विविध अधिकारी-कर्मचारी उपस्थित असणार आहेत.या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, पीएम आवास योजना, पीएम उज्वला योजना, पीएम विश्वकर्मा, पीएम किसान सम्मान, किसान क्रेडीट कार्ड (केसीसी), पीएम पोषण अभियान, हर घर जल-जल  जीवन मिशन, स्वामित्व, जन धन योजना, जीवन ज्योती बीमा योजना, सुरक्ष बीमा योजना, अटल पेन्शन योजना, पीम प्रणाम आणि  नॅनो फर्टीलायझर या योजनेचा लाभ उपलब्ध होणार आहे. 

या संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या या कल्याणकारी योजनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या