🌟दिशाभूल करणारे स्टेटमेंटच्या क्लिप बिआरएस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडुन व्हायरल ?


🌟परभणी जिल्ह्यातील जेष्ठ कॉंग्रेस नेते तथा आ.सुरेश वरपुडकर यांनी केला निषेध🌟

परभणी (दि.१० डिसेंबर) - तेलंगणा राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला तर या विधानसभा निवडणुकीत बिआरएसचा मोठा पराभव झाला. बिआरएस पक्षाने जनतेसमोर विकासाचे खोटे गुलाबी चित्र रंगवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शेतकऱ्यांना पिक कर्ज बंद करुन पिक विमा देखील दिला नाही. शेतमाल हमी भावानुसार खरेदीसाठीची यंत्रणा संपुष्टात आणली. यामुळे शेतकऱ्यांना हक्काचा मोबदला न मिळता खाजगी खरेदीदारांकडुन त्यांचे शोषण झाले. सिंचन प्रकल्पावर मोठा भ्रष्ट्राचार केला. या सर्वांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. तसेच रोजगार निर्मीती, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच बाबतीत सरकार पुर्णपणे अपयशी राहिले. बि.आर.एस. सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला दहा हजार रुपये देवुन खुष करण्याचा प्रयत्न केला. हे दहा हजार रुपये शेतकऱ्यांना द्यायलाच पाहिजे होते परंतु सोबतच शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना चालू ठेवणे आवश्यक होते. सर्व योजना बंद करुन दहा हजार रुपयांवर शेतकऱ्यांची बोळवण केली जात होती हे जणतेने ओळखले असे वास्तव्याशी निगडीत आभ्यास पूर्ण वक्तव्य माजी मुख्यमंत्री मा. अशोकरावजी चव्हाण यांनी केले परंतु या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढुण दिशाभूल करणारे स्टेटमेंटच्या क्लिप बि.आर.एस.च्या पदाधिकाऱ्यांकडुन व्हायरल केल्या जात आहेत. त्याचा काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही निषेध करतो असे सुरेश वरपुडकर हे म्हणाले......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या