🌟पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथे अखंड शिवनाम सप्ताहात परमरस्य ग्रंथाचे सामूहिक पारायण....!


🌟डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या माध्यमातून मागील ४८ वर्षांपासून महिला मंडळ करते शिवनाम सप्ताहाचे आयोजन🌟


पुर्णा (दि.२६ डिसेंबर) - पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथे राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या माध्यमातून मागील ४८ वर्षांपासून येथील महिला मंडळाच्या महिलांकडून शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते यामध्ये सकाळी चार शिवपाठ ,सहा वाजता महादेव महारुद्र अभिषेक,सात वाजता परमरहस्य ग्रंथाचे पारायण, अकरा वाजता गाथा भजन रात्री सात वाजता शिवनाम कीर्तन या दैनंदिन कार्य क्रमाने,  सात दिवसाची महिला प्रबोधन, समाजकार्य ,धार्मिकतेकडे ओढ स्त्रीचे कर्तव्य व जागरण आधी विषयावर संगीता पाटील बेंद्रीकर, व स्वाती दापकेकर , यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सोमवार रोजी अखंड शिवनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला.

यावेळी लक्ष्मी शिराळे, शोभा शिराळे, भाग्यश्री धुळशेटे, पार्वती शिराळे, मीना शिराळे,यमुना भाटेगावकर, लक्ष्मी शिराळे यांच्यातर्फे अन्नदानाचे आयोजन केले होते. शिवनाम सप्ताहा मध्ये कार्यक्रमाची धुरा ,भोगावती कुबडे ,लक्ष्मी शिराळे ,यशोदाबाई शिराळे ,शारदा स्वामी, सपना स्वामी ,आदिने सप्ताहात पुढाकार घेतला होता......

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या