🌟पुर्णा पंचायत समिती कार्यालयावर दि.०१ जानेवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचा भव्य मोर्चा....!


🌟अपंग बांधव,निराधार महिला ज्येष्ठ नागरिक यांच्या न्याय  हक्कासाठी प्रहारच्या वतीने मोर्चाचे आयोजन🌟 


पुर्णा (दि.२८ डिसेंबर) - पुर्णा पंचायत समिती अंतर्गत अपंग बांधव निराधार महिला यांना ग्राम पंचायत अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळावा व अपंग बांधव यांना 5% निधी मिळावा तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक येथील अपंग बांधव, निराधार महिला ज्येष्ठ नागरिक यांचें पगारीचे खाते ग्रामीण बँक मध्ये समाविष्ट करण्यात यावे यावं व इतर मागण्यांसाठी पुर्णा पंचायत समिती कार्यालयावर दि.०१ जानेवारी २०२४ रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.या भव्य मोर्चाच्या नियोजना संदर्भात काल बुधवार दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी कावलगाव सर्कल येथील सातेफळ व पेनुर देगाव, आवई ,सुहागण,येथील अपंग बांधवांना, निराधार महिला, जेष्ठ नागरिक,व गावातील मंडळी यांची भेट घेतली... श्रीहारी ईगोले सुरेश वाघमारे ,विठल बुडाले,चपत मामा कदम विष्णु चव्हाण.मुजाजी लोखंडे. हावसाजी तरासे,गणेश वानखेडे, गंगाधर ईगोले, गगाप्रसाद वळसे,रमेश जाधव माधव भोरे व सातेफळ व पेनुर ,देगाव,आवई, वाई,ढोणे पागरा, लोखंडे पिपळा,रुपला आढरी, हिवरा,चुडावा,पिपरण कलमुला,चागेफळ,येथील गावकरी मंडळी व प्रहार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या