🌟नांदेड-पूर्णा-शिंगणापूर राष्ट्रीय महामार्गावर पुलावरून दरीत आयशर ट्रक कोसळून घडला भयंकर अपघात....!


🌟अपघातात आयशर ट्रक चालक ठार तर क्लिनर गंभीर जखमी🌟

परभणी/पुर्णा (दि.१८ डिसेंबर) : नांदेड-पूर्णा-शिंगणापूर राष्ट्रीय महामार्गावर पुर्णा शहरालगत असलेल्या एका वळण पुलावरून विस फूट दरीमध्ये आयशर ट्रक कोसळून झालेल्या भयंकर अपघातात आयशर ट्रक चालकाचा जागीच मृत्यू तर क्लिनर हा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

 पुर्णा तालुक्यातील महागाव येथील आयशर चालक-मालक रंगनाथ श्रीपतराव रोडगे वय वर्षे ३५ व त्याच्या टेम्पो वरील क्लिनर भगवान तुकाराम वाघमारे वय वर्षे ३१ हे दोघेजण पुर्णा ते ताडकळस रस्त्याने काल रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ०९-०० वाजेच्या सुमारास आपल्या स्वतःच्या मालकीच्या आयशर क्रमांक एम.एच १४ डिएम ९२५२ या ट्रकमधून सोयाबीन गुळीचे गठण घेऊन ताडकळस रस्त्याने जात असताना पुर्णा नदीवरील वळण पुलाजवळ आले असता आयशर हा सरळ विस फूट खोल दरीमध्ये जाऊन कोसळला. यामध्ये ते दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर कानडखेड परिसरात मोठा आवाज आल्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती मिळता पुर्णा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक नागरिक व पोलीस यांच्या मदतीने जखमी अवस्थेतील चालक, क्लिनर या दोघांनाही दरीमधून वर काढण्यात आले. वर काढून त्या दोघांनाही पुर्णेतील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान चालक रंगनाथ श्रीपतराव रोडगे राहणार महागाव याचा मृत्यू झाला. तर क्लिनर भगवान तुकाराम वाघमारे रा.आजदापूर हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या