🌟विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचे लाभ घेण्याचे अवाहन....!


🌟संकल्प यात्रेच्या माध्यमातून मंगळवारी विविध गावांत दिले जाणार शासकीय योजनांचे लाभ व माहिती🌟

परभणी (दि.11 डिसेंबर) : विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या वंचित लोकांपर्यंत  विविध योजनेचे लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे परभणी जिल्ह्यात 24 नाव्हेंबर, 2023 ते दि. 26 जानेवारी, 2024 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जावून लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांना केंद्र व राज्याच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असुन, नांव नोंदणी करण्यात येणार आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी लाभ प्राप्त करुन घ्यावेत असे अवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

* परभणी जिल्ह्यात 12 डिसेंबर रोजी खालील गावामध्ये होणार विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन :-

मंगळवार, दि, 12 डिसेंबर, 2023  रोजी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आरबुजवाडी (सकाळ सत्र) आणि वाघलगाव (दूपार सत्र), पालम तालुक्यातील आजमाबाद (सकाळ सत्र) आणि कापसी (दूपार सत्र), परभणी तालुक्यातील दैठणा (सकाळ सत्र) आणि कौटंबवाडी (दूपार सत्र), जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी (सकाळ सत्र) आणि सावरगाव (दूपार सत्र), मानवत तालुक्यातील रत्नापूर (सकाळ सत्र) आणि मानोली (दूपार सत्र) तर सेलू तालुक्यातील तांदूळवाडी (सकाळ सत्र) आणि पिंपरी खु. (दूपार सत्र) या गावात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी  सदर यात्रेसमवेत ग्रामपंचायत विभागाचे विविध अधिकारी-कर्मचारी उपस्थित असणार आहेत.

या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, पीएम आवास योजना, पीएम उज्वला योजना, पीएम विश्वकर्मा, पीएम किसान सम्मान, किसान क्रेडीट कार्ड (केसीसी), पीएम पोषण अभियान, हर घर जल-जल  जीवन मिशन, स्वामित्व, जन धन योजना, जीवन ज्योती बीमा योजना, सुरक्ष बीमा योजना, अटल पेन्शन योजना, पीम प्रणाम आणि  नॅनो फर्टीलायझर या योजनेचा लाभ उपलब्ध होणार आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या या कल्याणकारी योजनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

सोमवार दि. 11 डिसेंबर, 2023 रोजी गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा व कौडगाव. पालम तालुक्यातील घोड सो. व फळा, परभणी तालुक्यातील ब्रम्हपूरी तर्फे पाथरी व साळापुरी, जिंतूर तालुक्यातील संक्राळा व दहेगाव, मानवत तालूक्यातील ईटाळी व उक्कलगाव, सेलू तालूक्यातील कवडधन व राधे धामणगाव या गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यात्रेदरम्यान वरील गावातील विविध कल्याणकारी योजनांची माहिती देवून, विविध योजनांच्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले आहे.......


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या