🌟छ.संभाजी नगर जिल्ह्यातील मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशाला लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या ताब्यात...!


🌟बेडशीट व्यवसायीक अब्दुल लतिफ यांच्यावर चाकूने वार करीत त्यांच्या जवळील ०७ हजार रुपये लुटण्याची घटना घडली होती🌟

छ.संभाजी नगर (दि.०३ डिसेंबर) - दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील नांदेड ते मनमाड रेल्वे प्रवासादरम्यान प्रवसीवर्गाचे दागिने/मोबाईल/बॅगा पळवण्याचे गंभीर प्रकार सातत्याने घडत असून असाच एक गंभीर प्रकार दि.२५ नोव्हेंबर २०२३ रोजी छ.संभाजीनगर जिल्ह्यातील मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर घडला छ.संभाजीनगर शहरातील रोषनगेट परिसरातील रहिवासी बेडशीटचे व्यवसायीक अब्दुल लतिफ अब्दुल गणी वय ४० वर्ष यांना मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर चार/पाच जनांच्या टोळक्याने प्रथमतः त्यांना पैशाची मागणी केली त्यांनी देण्यास नकार देताच त्यांच्यावर अक्षरशः चाकूने वार करीत त्यांच्या जवळील ०७ हजार रुपयांची रक्कम लुटण्याची घटना घडली होती.

या घटने संदर्भात मुकुंदवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता या टोळीचा म्होरक्या भारत शंकर तीर्थे उर्फ जॉन राहणार मुकुंदवाडी जिल्हा छ.संभाजीनगर हा केंब्रिज चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तो केंब्रिज चौकात येताच पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आत्माराम घुगे,अर्जुन राऊत, ठाणे अंमलदार गायकवाड यांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले व मुकुंदवाडी पोलिस स्थानकाच्या हवाले केल्याचे समजते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या