🌟जनसामान्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी सुरु असलेल्या साखळी ऊपोषणाची तहसिलदार यांच्या लेखी आश्वासनाने सांगता...!


🌟सिंचन विहीरी आणी राशन विभागाचे प्रलंबित प्रश्न आले चव्हाट्यावर🌟

फुलचंद भगत

वाशिम :- मंगरुळपीर येथील तहसिल कार्यालयासमोर अठरा डिसेंबर पासुन शेतकर्‍यांच्या प्रलंबित सिंचन विहिरी आणी पाञ लाभार्थ्यांना राशन योजनेपासुन वंचित ठेवल्याचा ठपका ठेवत शरद पवार गटाचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनंता काळे यांनी साखळी ऊपोषणाला सुरुवात केली आहे.सोबतच जनसामान्यांचे प्रश्न रेंगाळत ठेवणार्‍या अधिकार्‍यांना प्रतिकात्मक भ्रष्ट अधिकारी पुरस्कार ही ठेवले होते.अखेर दुसर्‍या दिवशी मंगरुळपीर येथील तहसिलदार यांनी ऊपोषणकर्त्यांशी चर्चा करुन लेखी आश्वासन दिले त्यामुळे सदर ऊपोषणाची सांगता करण्यात आली.

              मंगरुळपीर तालुक्यातील दाभा येथील शेतकर्‍यांच्या सिंचन विहीरीचे प्रस्ताव हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवुन प्रशासनाने खोळसांळपणाची भुमीका ठेवल्याचा आरोप करत तसेच तेथीलच राशन दुकान प्रशासनाने निलंबित केले होते त्यानंतरही मालाची ऊचल करुन दुकान सुरुच होते त्याची रिकवरी करुन संबधित दोषीवर कायदेशिर कारवाई करावी यासोबतच गावातील अंत्योदय योजनेचे राशन कार्ड बनवुन शासकीय धान्याची अपाञ लोकांनी ऊचल करुन शासनाची दिशाभुल केली असल्याने सदर अपाञ कार्ड त्वरीत रद्द करुन पाञ लाभार्थ्यांना राशनचा लाभ देण्याच्या मागणीसाठी शरद पवार गटाचे वाशिम जिल्ह्याचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनंता काळे यांचेसह गावकर्‍यांनी अठरा डिसेंबर रोजीपासुन साखळी ऊपोषणाला सुरुवात केली.मंगरुळपीर तहसिल प्रशासनाने ऊपोषणाची दखल घेत म्हणने ऐकुन घेवुन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे लेखी पञही दिले परंतु त्यावर ऊपोषणकर्त्याचे समाधान न झाल्यामुळे ऊपोषण सुरुच ठेवले आहे.आता याप्रकरणी वरिष्ठ प्रशासन नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते शेवटी दि.१९ डिसेंबर रोजी तहसिलदार यांनी ऊपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यामुळे सदर ऊपोषणाची सांगता करण्यात आली आहे......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या