🌟महाराष्ट्र राज्यातील माजी सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पणाचे संकेत.....!


🌟परभणी किंवा हिंगोली किंवा नांदेड लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याची दाट शक्यता ?🌟

संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात देखील सध्या लोकसभा निवडणुकपुर्व जोरदार तयारी सुरू असल्याचे निदर्शनास येत असून देशासह राज्यातील देखील सर्वच राजकीय पक्ष तुल्यबळ उमेदवारांच्या शोधमोहीमेत असल्याचे व आपापले तुल्यबळ उमेदवार निश्चित करीत असतांना आता राज्यातील माजी सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार हे देखील राजकारणात सक्रिय होणार असल्याची व आगामी लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 मुख्यमंत्री वॉर रुमचे महासंचालक तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे पुर्व संचालक आय एमएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी नुकताच मुख्यमंत्री वॉर रुमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते राजकारणात देखील एन्ट्री करतील आणि परभणी लोकसभा मतदारसंघ किंवा हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवतील अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होतांना पाहावयास मिळत असून या चर्चेमुळे परभणी/हिंगोली जिल्ह्यात अक्षरशः खळबळ माजली आहे.

देशभर सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्ष आता आपले उमेदवार निश्चित करू लागलेत. त्यातच आता राधेश्याम मोपलवार हे देखील राजकारणात पदार्पण करतील अशी चर्चा जोरदार रंगली आहे. मुख्यमंत्री वॉर रुमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही चर्चा अधिकच रंगू लागलीय मोपलवार हिंगोली/परभणी किंवा नांदेड -लोकसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. राधेश्याम मोपलवार यांच्या बाबत ज्या चर्चा रंगल्या तसे झाले तर आजवर ज्या अधिकाऱ्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांच्या यादीत मोपलवार असणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या