🌟पुर्णा तालुक्यातील मौ.लोण खुर्द येथील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या माणीका वाकोडेंच्या कुटुंबाला आर्थिक मदत...!


🌟सकल मराठा समाजाच्या मागणीला यश : मराठा सेवकांनी केला सतत शासनाकडे पाठपुरावा🌟


🌟तहसिलदार बोथीकर,तलाठी राजश्री देसाई सपोनि.पोमनाळकर यांनी पाठवला होता प्रस्ताव🌟 

🌟तहसिलदार माधवराव बोथीकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील १० लाख रुपयांचा चेक वाकोडे कुटुंबांच्या केला स्वाधीन🌟 


पुर्णा (दि.१२ डिसेंबर) - पुर्णा तालुक्यातील मौजे लोण खूर्द येथे मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या २२ वर्षीय कै.माणीका महादु वाकोडे यांच्या कुटुंबाला आज मंगळवार दि.१२ डिसेंबर रोजी तहसिलदार माधवराव बोथीकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.


या संदर्भात सविस्तर वृत्त असे की लोण खुर्द येथील माणीका महादू वाकोडे वय २२ वर्ष या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता चिठ्ठी लिहुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि.०९ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली होती या घटने संदर्भात तसी फिर्याद चुडावा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती व पुर्णेतील शासकीय ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन देखील करण्यात आले होते या घटनेतील सर्व बाबी तपासुन व पुर्णेतील सकल मराठा समाजाच्या मागणी वरुन पुर्णेचे तहसीलदार माधवराव बोथीकर,नायब तहसीलदार थारकर,तलाठी राजश्री देसाई व सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमणाळकर यांनी महाराष्ट्र शासणाकडे निधीसाठी प्रस्थाव पाठवला होता या प्रस्ताव तात्काळ मंजूरी संदर्भात सकल मराठा समाजासह मराठा सेवक मराठा सेवक साहेबराव कल्याणकर,मुंजाभाऊ कदम, बाळासाहेब जोगदंड, ज्ञानोबा कदम यांनी सतत पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अवघ्या एक महिन्यात १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला सदरील मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील १० लाख रुपयांचा धनादेश आज तहसिलदार माधवराव बोथीकर नायब तहसीलदार थारकर तलाठी राजश्री देसाई यांनी वाकडे कुटूंबातील मयताचे वडिल महादू वाकोडे व आई यांच्या स्वाधीन केला यावेळी शासकीय कर्मचारी व मराठा सेवक साहेबराव कल्याणकर मुंजाभाउ कदम बाळासाहेब जोगदंड ज्ञाणोबा कदम व रंगनाथ कटारे हे उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या