🌟वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे अवैध धंद्याविरोधात शोले स्टाईल आंदोलन.....!


🌟मंगरूळपीर तालुक्यात राजरोसपणे सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी मनसेचे 'जय विरू' चढले टाॅवरवर🌟


फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर शहरात तसेच ग्रामिण भागातही अवैध दारू विक्रीचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय होत असून या अवैध दारू विक्री दारू विक्रीला तात्काळ आळा घालावा सोबतच अवैध विटभट्ट्या,तांदुळतस्करी,रेतीतस्करी,गौणखनिज तस्करीही राजरोसपणे सुरु आहे.हे सर्व धंदे तालुक्यातुन हद्दपार करावेत या मागणीकरीता म न से चे कार्यकर्ते विकास दाभाडे व शिवम आमटे यांनी ता. २८ रोजी सकाळी ८ वाजता टावरवर चढुन निषेध केला आहे.आंदोलनकर्त्यांनी खाली आनन्यासाठी प्रशासनाला दुपारपर्यत मनधरणी करावी लागली शेवटी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सदर आंदोलन थांबवन्यात आले.

                 मनसेच्या वतीने दि. 11/12/2023 रोजी दिलेल्या निवेदनावर कुठलेही ठोस कारवाई न झाल्यामुळे दि. 28/12/2023 मंगरूळपीर शहरातील पाण्याची टाकी अथवा टॉवर चढुन मनसे वाहतुक सेने तर्फ आंदोलन करणार आहे करिता माहितीस सबंधित सर्व यंञणेस लेखी निवेदन दिले होते.दि. 11/12/2023 रोजी दिलेल्या निवेदन देण्यात आले होते त्या मध्ये मंगरूळपीर शहरातील एका वाईन शॉपीमध्ये देशी दारूचे दुकानातून अवैध रित्या शहरातील ग्रामीण भागात, धाब्यावर देशी दारू व इंग्लिश दारू राजरोसपणे अवैधरीत्या वाहतुक करून विक्री केली जात आहे. या संदर्भात्त कार्यकर्त्याकडे सबळ पुरावे असून एका वाईन शॉपी मध्ये महिन्याकाठी किती दारूचा स्टॉक उतरतो त्याचे स्टॉक रजिस्टर चौकशी करावी छायांकित प्रत व त्यांनी भरणा केलेला टैक्स सदर्भात त्याचे पावत्या हे देण्यात याव्या असे नमुद करण्यात आले होते एवढेच नव्हे तर अग्रगण्य दैनिकात बातम्या देखिल प्रकाशित करण्यात आले होते.राशनचा तांदुळाची तस्करी,रेती गौणखनिज तस्करी,अवैध वाटभट्ट्या याही राजरोजपने सुरु आहेत.मनसे पदाधिकार्‍यांनी दिलेल्या निवेदनावर सबंधित प्रशासनाने कुठलेही गांभीर्यपूर्वक विचार न करता कुठलीही  कारवाई न करता अपेक्षित अशी ठोस कारवाई न झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेने तर्फे दि. 28/12/20223 रोजी मंगरूळपीर शहराती पाण्याची टाकी अथवा टॉवर वर चढून आंदोलन करणार आहे असे निवेदन दिले मात्र निवेदनाची दखल घेतली नाही म्हणून मनसे पदाधिकार्‍यांनी शहरातील बिएसएनएलच्या टावरवर चढून शोले स्टिईल आंदोलन केले.सदर आंदोलनाची दखल घेऊन यापुढे ठोस कारवाई करण्यात येईल असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ किडसे पाटील,गजानन वैरागडे यांचेसह मनसेचे पदाधिकारीही आंदोलनस्थळी ऊपस्थीत होते.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या