🌟स्वातंत्र्यानंतर सरकारने संविधानाचे प्रबोधन केले नाही - प्रकाश कांबळे


🌟संविधान गौरव सोहळ्याच्या २२ सा व्या वर्षा च्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारी निमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते 🌟

देशाच्या स्वातंत्र्यानंतर सत्तारूढ असणाऱ्या केंद्रातील आणि राज्यातील कोणत्याच सरकारने नागरिकांना संविधानाने दिलेले आधिकर कळू दिले नाहीत त्यामुळे संविधानाआड लोकशाहीत हुकुमशाही प्रवृत्ती डोके वर काढत आहे असा सनसनाटी आरोप रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी स्वातंत्र्यानंतरच्या सत्तारूढ सरकारवर करून संविधान सुरक्षित राहिले तर देश सुरक्षित राहील त्यासाठी नागरिकांना संविधानाचे प्रबोधन आवश्यक आहे.असे मत पूर्णा नगर पालिकेतील पुण्यष्लोक आहील्याबई होळकर सभागृहात झालेल्या संविधान गौरव सोहळ्याच्या २२ सा व्या वर्षा च्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारी निमित्त संविधान गौरव समितीच्या वतीने घेतलेल्या बैठकीत व्यक्त केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पूर्णा नगर पालिकेचे मुख्याधिकारी  युवराज पौळ हे होते तर ज्येष्ठ समाजसेवक डॉ.दत्तात्रय वाघमारे आणि पूज्य.भदंत पंय्यावंश यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या बैठकीत अनेक मान्यवरांनी संविधानाप्रति आपली परखड मत मांडली.

"संविधान सुरक्षित राहिले तर देश सुरक्षित राहील,अन्यथा देशाचे पुन्हा जाती धर्माच्या नावाने तुकडे होतील."असा इशारा प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले यांनी व्यक्त केला.तर प्रा.अशोक कांबळे यांनी संविधान टिकेल तर देश टिकेल असे वक्तव्य केले.तर आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये असे भावनिक आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.दत्तात्रय वाघमारे यांनी केले. इ.व्ही.एम. मशीनने मतदान मतदान सदोष होत आहे त्याची जनजागृती होण्याबाबत आवाहन ॲड.हर्षवर्धन गायकवाड यांनी केले तर पुर्णा नगर परिषदेचे गट नेते उत्तम खंदारे यांनी प्रत्येकाने आपापल्या समाजात संविधानाचे प्रबोधन करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.असे विचार मांडले.अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात ही तेथील महिला राष्ट्राच्या मुख्य पदावर जाऊ शकल्या नाहीत पण भारतीय संविधाना मुळे भारतातील महिलांना न्याय मिळाला.असे विचार बौद्ध महा सभेचे तालुका प्रमुख श्रीकांत हिवाळे यांनी मांडले. तर रौफ कुरेशी, प्रा. नसीर,अतिक,विजय सातोरे,भीमा वाहुळे,या कार्यक्रमासाठी संविधानाचे प्रबोधन करण्यासाठी ख्यातनाम मान्यवरांची नावे सुचविली.या बैठकीचे प्रास्ताविक त्रिंबक गोविंदराव कांबळे यांनी केले.

     या बैठकीला प्रामुख्याने कॉ.अशोक कांबळे, ॲड.राहुल वाघमारे,डॉ.संदीप जोंधळे,डॉ.वंदना खंदारे,मिलिंद कांबळे,राजकुमार सुर्यवंशी,प्राचार्य केशव जोंधळे,मुकुंद पाटील,विजयकुमार जोंधळे, प्रा.गौतम काळे,बाबाराव वाघमारे,दिलीप गायकवाड,संभाजी रणविर,सुबोध कांबळे,रमेश बाऱ्हाटे,रमेश बरकुंटे,चंद्रमणी लोखंडे,राजू पुंडगे ,अमृत मोरे,नागेश येंगडे कुंदन ठाकूर,स.सलीमआदि मान्यवरांसह अनिल अहिरे,मोहन लोखंडे,अरविंद कांबळे,सय्यद कलीम,प्रदीप ननवरे,कैलाश बलखंडे,आदि वृत प्रतिनिधी सह मोठ्या संख्येने लोकांनी या बैठकीला हजेरी लावली होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या