🌟परभणी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर......!


🌟विकसित भारत संकल्प यात्रा’ 30 डिसेंबर रोजी गंगाखेड तालुक्या🌟

परभणी (दि.29 डिसेंबर) : विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या वंचित लोकांपर्यंत  विविध योजनेचे लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचे परभणी जिल्ह्यात 24 नोव्हेंबर, 2023 ते दि. 26 जानेवारी, 2024 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जावून लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांना केंद्र व राज्याच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असून, नाव नोंदणी करण्यात येणार आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी लाभ प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

शनिवार दि. 30 डिसेंबर, 2023  रोजी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील सुप्पा (सकाळ सत्र) आणि इसाद (दुपारी), पालम तालुक्यातील बोरगाव खुर्द (सकाळी) आणि बोरगाव बु. (दुपारी), परभणी तालुक्यातील पाथरा (सकाळी) आणि ताडलिंबला (दुपारी), जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे (सकाळी) आणि पाचलेगाव (दुपारी), पाथरी तालुक्यातील गौंडगाव (सकाळी) आणि उमरा (दुपारी) तर सेलू तालुक्यातील पिंप्राळा (सकाळी) आणि रायपुर (दुपारी) या गावात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या यात्रेसमवेत ग्रामपंचायत विभागाचे विविध अधिकारी-कर्मचारी उपस्थित असणार आहेत.

या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, पीएम आवास योजना, पीएम उज्वला योजना, पीएम विश्वकर्मा, पीएम किसान सम्मान, किसान क्रेडीट कार्ड (केसीसी), पीएम पोषण अभियान, हर घर जल-जल  जीवन मिशन, स्वामित्व, जन धन योजना, जीवन ज्योती बीमा योजना, सुरक्ष बीमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम आणि  नॅनो फर्टीलायझर या योजनेचा लाभ उपलब्ध होणार आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या या कल्याणकारी योजनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या