🌟स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन....!


🌟प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟 

पुर्णा (दि.०६ डिसेंबर) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात भारतीय संविधानाचे निर्माते बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या  वतीने विनम्र अभिवादन केले तर यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.सुरेखा भोसले, अधिसभा सदस्य डॉ विजय भोपाळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांस्कृतिक प्रभारी प्रा.डॉ प्रकाश सूर्यवंशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.पी.डी सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा.डॉ. प्रभाकर किर्तनकार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.भीमराव मानकरे, प्रसिध्दी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय कसाब,  प्रा. डॉ.दीपमाला पाटोदे, प्रा.डॉ.संतोष कुऱ्हे, प्रा.डॉ.अशोक कोलंबीकर, डॉ. विलास काळे,प्रा. डॉ.मारोती भोसले, प्रा. डॉ.शारदा बंडे, प्रा. दता पवार,वरिष्ठ लिपिक सूर्यकांत भोसले, दत्ता कदम , प्राध्यापक व कर्मचारी  मोठ्या  संख्येने उपस्थित उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या