🌟प्रहार जनशक्ती पक्षाच्या तक्रारीनंतर मानव विकास सायकल घोटाळा चौकशीला वेग....!


(फाईल चित्र)

🌟जिल्ह्यातील १९२ मुख्याध्यापकांना तातडीने सर्व कागदपत्रासह चौकशीसाठी हजर राहण्याच्या चौकशी समितीच्या सूचना🌟


परभणी - सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी इयत्ता आठवी ते बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील गोरगरीब मुलींना मानव विकास योजनेअंतर्गत मोफत सायकल वाटपासाठी मानव विकास योजनेतून ८ हजार ६९ लाभार्थी विद्यार्थ्यांनीसाठी प्रति सायकल पाच हजार रुपये प्रमाणे ०४ कोटी ०३ लाख ४५ हजार रुपये मंजूर करून तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आले होते.

योजनेतील नियमावलीप्रमाणे लाभार्थी विद्यार्थिनींना सायकल घेण्यासाठी विद्यार्थिनींच्या वैयक्तिक खात्यावरती सुरुवातीला ०३ हजार ५०० रुपये व सायकलची पावती जमा केल्यानंतर १ हजार ५०० रुपये याप्रमाणे ०५ हजार रुपये जमा करणे आवश्यक होते परंतु तत्कालीन शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड यांनी मुख्याध्यापकांना हाताशी धरून संबंधित रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा न करता मुख्याध्यापकांच्या खात्यावरती वर्ग केली त्यामुळे ही रक्कम लाभार्थ्यापर्यंत पोहोचू शकली नाही. या घटनेचे चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल मॅडम यांनी पाच महिन्यापूर्वी दिली होती परंतु चौकशी समिती चे प्रमुख श्री संजय ससाने यांना माध्यमिक विभागातील कर्मचारी व अधिकारी मदत करत नसल्याने ही चौकशी मागील पाच महिन्यापासून प्रलंबित होती.

याबाबत दिनांक ०५ डिसेंबर २०२३ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन थांबलेली चौकशी तात्काळ पूर्ण करून शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन एक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड, माध्यमिक विभागातील संबंधित अधिकारी व मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करावेत असे मागणी केली होती.या प्रकरणातील गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी यांनी दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून तात्काळ चौकशी पूर्ण करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते त्याचबरोबर दिनांक ०७ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मानव विकास प्रमुख व मानव विकास सायकल घोटाळा चौकशी समिती प्रमुख यांच्यात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सात दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करून संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिलेल्या तक्रारी मुळेच मानव विकास सायकल घोटाळा प्रकरणी जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून चौकशी समितीच्या प्रमुखांनी जिल्ह्यातील १९२ मुख्याध्यापकांना १२ डिसेंबर २०२३ व १३ डिसेंबर २०२३ रोजी सर्व कागदपत्रासह वैयक्तिक हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.या चौकशीत सत्य बाहेर येऊन जिल्ह्यातील ८ हजार ६९ गोरगरीब मुलींना त्यांच्या हक्काच्या सायकली मिळतील.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या