🌟नादेड-जालना समृध्दी महामार्गाकरीता संपादित होत असलेल्या शेतजमिनीतील पाईप लाईनची तात्काळ नोंद करा....!


🌟अखिल भारतीय छावा संघटनेची जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी🌟 

परभणी/पुर्णा (दि.०६ डिसेंबर) - नांदेड-जालना समृध्दी महामार्गाकरीता पुर्णा तालुक्यातील आलेगांव,पिंपरण,चांगेफळसह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून भरपूर प्रमाणात संपादीत केल्या जात आहेत सदरील संपादीत होत असलेल्या बऱ्याच शेतजमीनींमघ्ये संबंधीत शेतकऱ्यांनी गोदावरी नदीपात्रातून मोठमोठ्या पाईपलाईन केलेल्या आहेत तसेच आलेगाव येथील गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन देखील जमीन संपादनामुळे बाधीत होत आहे परंतू समृध्दी महामार्गासाठी जमीनी संपादीत करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांनी चुकीचे पंचनामे करुन सद्य स्थितीत असलेल्या पाईपलाईनची नोंद व्यवस्थीतरित्या घेतलेली नाही. 

याहीपेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे चावडी वाचनामध्येही बऱ्याच प्रमाणात त्रुटी आढळत असून संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करते वेळेस देखील पंचनाम्यात पाईपलाईनचा उल्लेख केला नसल्यामुळे चावडी वाचना देखील पाईपलाईनचा उल्लेख आलेला नाही त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांवर हा एकप्रकारे अन्यायच केल्याने संबंधीत शेतकऱ्यांसह आलेगाव येथील समस्त ग्रामस्थांमध्ये देखील प्रचंड असंतोष निर्माण झालेला असून त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे या संदर्भात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी  सखोल चौकशी करुन पुन्हा पंचनामे करण्याबाबत सं॑बंधीतांना आदेश द्यावेत अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने एका निवेदनाद्वारे दि.०४ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे केली असून या निवेदनावर अखिल भारतीय छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गोविंदराव मुळे,परभणी जिल्हाध्यक्ष छत्रपती शिंदे,युवा जिल्हाध्यक्ष गजानन सवराते, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ गुंडाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या