🌟परभणी येथे जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली संपन्न.....!🌟जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते भव्य रॅलीचे आयोजन🌟 

परभणी (दि. 01 डिसेंबर) : जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालयाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोरे, महा नगरपालीकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सावंत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र लोलगे यांची प्रमुख उपस्थिती होती.


 
रॅलीमध्ये एच.आय.व्ही एड्स बद्दल कला पथकांचे सादरीकरण तसेच देखाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा मार्ग हा जिल्हा रुग्णालय पासून ती पुढे सुभाष रोड, जाम नाका, जिंतुर रोड मार्गे, काराग्रह वर्ग-२ समोरुन रोडने, जिल्हा रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र येथे विसर्जीत करण्यात आली.

या रॅलीमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी व सेतू सेवाभावी संस्था, मुक्ता सेवाभावी संस्था, एन.पी.डी.पी. प्लस यांचे प्रतिनिधी, जिल्हा परिचारीका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थीनी, शहरातील विविध कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनचे विद्यार्थी व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी/विद्यार्थीनी, सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा सहभाग होता.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या