🌟पुर्णा तालुक्यातील गौर गावच्या कर्तृत्ववान भुमिपुत्राची पुणे जिल्ह्यातील बारामती महसूल प्रशासनात उंच भरारी.....!


🌟बारामती महसूल प्रशासनात कार्यरत तलाठी गजानन नारायणराव पारवे यांना मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती🌟


परभणी/पुर्णा (विशेष वृत्त - चौधरी दिनेश) - पुणे जिल्ह्यातील बारामती तहसिल कार्यालया अंतर्गत महसूल प्रशासनात तलाठी म्हणून कार्यरत परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील गौर गावचे अल्पभूधारक शेतकरी नारायणराव पारवे यांचे सुपुत्र तथा पुर्णा तालुक्यातील कर्तृत्ववान भुमिपुत्र तलाठी गजानन नारायणराव पारवे यांना पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री डॉ.राजेश देशमुख यांनी नुकतेच दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी गट-क तलाठी संवर्गातून गट-क मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती बहालीचे आदेश जारी केले असून या आदेशावर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम पुणे यांची देखील स्वाक्षरी आहे.

पुर्णा तालुक्यातील पुर्णा-नांदेड राज्यमार्गावर चार/साडेचार हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या गौर गावातील अल्पभूधारक कष्टकरी शेतकरी नारायणराव पारवे यांचे उच्चशिक्षित सुपुत्र गजानन नारायणराव पारवे यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उच्चशिक्षण घेतले स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून त्यांनी सन २०१४ यावर्षी तलाठी पदाची परिक्षा दिली या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका महसूल प्रशासनात तलाठी म्हणून नियुक्ती झाली नुकतीच त्यांनी पुणे जिल्हा महसूल प्रशासनांतर्ग झालेल्या परिक्षेत सहभाग नोंदवून ही देखील परिक्षा ते उत्तीर्ण झाल्याने पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी त्यांना गट-क तलाठी संवर्गातून गट-क मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती बहालीचे आदेश जारी केल्याने परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील गौर गावाच्या या कर्तृत्ववान भुमिपुत्राने पुणे जिल्ह्यातील बारामती महसूल प्रशासनात आपल्या कर्तृत्वाने उंच भरारी घेत मंडळ अधिकारी पदापर्यंत मजल मारल्याचे निदर्शनास येत असून त्यांना मिळालेल्या पदोन्नतीबद्दल त्याचं गौर गावातील गावकरी मंडळींसह मित्र परिवार तसेच आप्तस्वकीयांकडून अभिनंदन होत असून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा मिळत असून बारामती महसूल प्रशासनात कार्यरत मंडळ अधिकारी गजानन नारायणराव पारवे हे पुर्णेतील प्रतिष्ठीत व्यापारी तथा शिवकृपा इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिकचे मालक राम नारायण पारवे यांचे लहान बंधू तर पुर्णा न्यायालयात कार्यरत जेष्ठ लिपीक श्री ज्ञानेश्वरजी कुऱ्हे यांचे जावई आहेत......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या