🌟पुर्णेत भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष.....!


🌟शहरात ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये मिठाईचे वाटप🌟



पुर्णा : पुर्णा शहरांमध्ये आज रविवार दि.०३ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशातील विधानसभा  निवडणुकीमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान,छत्तीसगड या तीन राज्यामध्ये मतदारांनी देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर सार्थ विश्वास दाखवून प्रचंड बहुमताने सरकार निवडून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये मिठाईचे वाटप करून पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात विजय उत्सव साजरा केला.


याप्रसंगी तालुकाध्यक्ष नरहरी ढोणे,शहराध्यक्ष प्रशांत कापसे,भारत एकलारे,हनुमानशेठ अग्रवाल,ऋषिकेस सकनुर ,विजय कराड,गोपाळराव अंभोरे,संजय मोहिते, राम चापके,विनय कराड,कैलाश सवराते,उद्धव मोरे,नरहरी साखरे ,निवृत्ती बोकारे,रावजी हेंडगे,लहू शेळके,डॉ.अजय ठाकूर,चंद्रकांत टाकळकर,सुनील डुब्बेवार,संतोष बनसोडे,बालाजी कदम,संजय अंभोरे रोशन एकलारे,राम पुरी,श्रीकांत कदम,परमेश्वर डहाळे,मोतीराम कदम इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या