🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ, महसूल विभागाच्या आकडेवारीने चिंता वाढली🌟

* अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांची यादीच काढली

* विट्याच्या हत्तीला गुजरातला विकण्यासाठी घेऊन गेले, विट्यात उडाली खळबळ

* मिरजमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांचा रेल रोकोचा प्रयत्न, आंदोलक-पोलिसांमध्ये जोरदार झटापट

* महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट, छगन भुजबळांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं

* मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ, महसूल विभागाच्या आकडेवारीने चिंता वाढली

* मराठा आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, मनोज जरांगेंना विश्वास

* राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, मोहम्मद शमीसह 26 जणांना अर्जुन पुरस्कार

* बलात्कारांच्या घटनेत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर, रामावर एवढं प्रेम असेल तर सीतामाईचं संरक्षण करा; जयंत पाटलांचा हल्लाबोल

* मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी ; नागपूर सोलर कंपनी स्फोट प्रकरणी सरकारची मोठी घोषणा

* ठाण्यात सापडला नवीन व्हएरइयंटचआ रुग्ण, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू

*अयोध्यातील राममंदिर उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूर करांना निमंत्रण

* विरोधकांनी विदर्भाच्या विकासावर प्रस्ताव मांडला नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* महाराष्ट्रात पहिल्यांदाच सांगलीमध्ये होणार 'मिस्टर इंडिया' स्पर्धा

* मिरजच्या न्यु इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा सप्ताहाची सुरुवात

* धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये दोन पुरुषांसह एका 10 वर्षांच्या मुलीचा समावेश

* सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने कांद्याचे भाव कोसळले, शेतकरी नाराज तर ग्राहक खुष 

* मुंबईत आधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपयांचं अनुदान, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी घोषणा

* जमीन घोटाळा संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना पाठवलं समन्स

* संस्कृती बालगुडेच्या '8 दोन 75'चा टीझर आऊट; हा चित्रपट 19 जानेवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

* यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार रिंगण कादंबरीला जाहीर

* 'मोदी हटाओ देश बचाओ' ; खासदार निलंबनावरून सोलापुरात शरद पवार गट आक्रमक; थेट रस्त्यावर आंदोलन

* हरित ‘ई-बस’ची संख्या वर्षभरात दुपटीने वाढणार! सरकारी मंडळांकडून मोठी मागणी, खरेदी किंमतीही घटण्याचा अंदाज

* राज्यात हुडहुडी वाढली! महाराष्ट्रात काही भागात तापमान 10 अंशांच्या खाली; यवतमाळ मध्ये 8.7 तर नागपूर मध्ये 9.8 अंश तापमानाची नोंद....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या