🌟ब्राह्मण समाजाची स्वतंत्र परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे....!


🌟आ.मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे परशुराम महामंडळा करीता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साकडे🌟

परभणी (दि.13 डिसेंबर) : अनेक वर्षांपासून समस्त ब्राह्मण समाजाची स्वतंत्र परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी आहे. या पार्श्‍वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात दि. 12 रोजी एका शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन देवून चर्चा केली. त्यासाठी आ. मेघना बोर्डीकर यांनी पुढाकार घेतला.


           या चर्चेत स्वतंत्र परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करावे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तसेच सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्य करण्यासाठी परशुराम भवन उभारावे. ब्राह्मण पुरोहितांना 5000 रुपये मासिक मानधन व त्यांना विविध मंदिरात नियुक्ती करून त्यांच्या कडून मंदिरात नित्य पूजा लावल्या जातील. वंशपरंपरागत हस्तगत असलेल्या इनामी जमीन जो ब्राह्मण समाज सांभाळत आहे त्या इनामी जमिनीचा मालकी हक्क कायमस्वरूपी त्यांच्या ताब्यात द्यावा. ब्राह्मण समाजाच्या सुरक्षेतेसाठी विशेष कायदा करून सामाजिक विटंबनातून बचाव करण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा आदी सर्व मागण्या नागपूर अधिवेशनात मंजूर करून घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली.  यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच वरील सर्व मागण्यावर शासन योग्य तो निर्णय घेऊन अंमलबजावणी करेल, असे आश्‍वासन दिले.

            निवेदनावर संयोजक स्वप्नील पिंगळकर, डॉ. अशोक सेलगावकर, सचिन शेटे, अजिंक्य औंढेकर, विशाल जोशी, संजय सुपेकर, प्रकाशदेव केदारे, योगेश उन्हाळे, मंदार कुलकर्णी, सौ. शिलाताई शेटे, दीपक कासंडे, नितीन शुक्ल, विश्‍वंभर दैठणकर, अजिंक्य मुदगलकर, नरेंद्र कुलकर्णी, सचिन भरड, अमोल लंगर, कुलदीप पुरंदरे, अनंत जोशी, संजय जोशी वझुरकर, संदीप साळापुरीकर, प्रदीप जोशी, पुरुषोत्तम तोताडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या