🌟पुर्णेत राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सुखदेव सिंहजी शेखावत गोगामेडी यांच्या हत्येचा निषेध....!


🌟पुर्णा तालुका महाराष्ट्र राजपुत क्षञीय संघाने घटनेतील अपराध्यांना कठोर शिक्षा करण्याची केली मागणी🌟 

परभणी/पुर्णा (दि.०८ डिसेंबर) - श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष स्व श्री सुखदेव सिंहजी शेखावत गोगामेडी (राजस्थान) यांच्या निर्घृण हत्येचा आज शुक्रवार दि.०७ डिसेंबर रोजी पुर्णा तालुका महाराष्ट्र राजपुत क्षञीय संघाकडून तिव्र निषेध करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ पुर्णा तालुका महाराष्ट्र राजपुत क्षञीय संघाने तहसिलदार माधवराव बोथीकर यांना निवेदन देऊन आपराध्यांना कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी मागणी केली.

पुर्णा तालुका महाराष्ट्र राजपुत क्षञीय संघाने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री सुखदेव सिंहजी शेखावत गोगामेडी राजस्थान यांची काही अज्ञात समाजकंटकांनी गोळ्या घालून हत्या केली या घटनेचा पूर्णा तालुक्यातील सर्व राजपूत समाज बांधव तीव्र शब्दात निषेध करत आहेत तसेच ज्या समाजकंटकांनी हे कृत्य  केले त्या नराधमांना शासनाने त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी व समस्त राजपूत समाजाच्या  भावनांचा आदर  करून राजपूत समाजाला न्याय द्यावा.तसेच योग्य तो न्याय न मिळाल्यास पुर्ण राजपुत समाज रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करील याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार पूर्णा यांना देण्यात आले आहे यावर राजपूत संघटनेचे  ॲड.गोविंद विजयसिंह ठाकूर कैलास कचरूसिंह ठाकूर सुरज सिंह ठाकुर कैलासिंह नरसिंह ठाकूर आकाश कुंदन सिंह ठाकुर जयसिंग चंदन गोविंद चव्हाण अर्जुन सिंग ठाकूर शैलेंद्रसिंह करण सिंह ठाकुर श्याम सिंह चव्हाण धनराज सुरेंद्र सिंह ठाकुर किरण सिंह ठाकुर भरत राणा संभाजी मोरे, गुलाब सिंग ठाकूरपरभणी, केशव मोरे, प्रमोद मोरे, जीवन चव्हाण, आदित्य मोरे, सुनील मोरे, शैलेंद्र ठाकूर, रितेश चव्हाण, सुरत सिंह ठाकुर आदींनी तहसीलदार यांना दिले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या