🌟पुर्णेतील रेल्वे प्रश्नां संदर्भात संसदरत्न खा.फौजिया खान यांना निवेदन.....!


🌟परभणी जिल्हा डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आले निवेदन🌟 

पुर्णा :- येथील रेल्वे प्रश्ननासंदर्भात खा.फौजिया खान यांना डी वाय एफ आय वतीने निवेदन देण्यात आले डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया परभणी जिल्हा शाखेच्या वतीने पूर्णेतील रेल्वे संदर्भातील प्रश्नांना घेऊन  दिनांक २७ डिसेंबर रोजी राज्यसभा खा.मा. फौजिया खान  यांच्या निवासस्थानी रेल्वे प्रश्नावर सविस्तर चर्चा करून  निवेदन देण्यात आले. संघटनेकडून रेल्वे प्रशासनाला सातत्याने निवेदने देणे व आंदोलने करण्यात आलेली आहेत. याशिवाय ०८ फेब्रुवारी रोजी त्यांनी पुढाकार घेऊन पूर्णेत सर्वपक्षीय व संघटनांनी रेल्वेचे इलेक्ट्रिक शेड आणि इतर मागण्यांना घेऊन पूर्णा बंद करीत आंदोलन केले होते. 


त्या आंदोलनातील  मागण्यांचे निवेदन त्यांनी इतर संबंधित विभाग व खा. फौजिया खान यांना पोस्टाद्वारे सुद्धा पाठविले होते. खा.खान यांनी परभणी मतदारसंघातील विशेषतः पूर्णेतील रेल्वे प्रश्नी संसदेत(राज्यसभेत) संसदेत आधी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत. म्हणून संघटनेला आशा आहे की त्या पूर्णेतील रेल्वे प्रश्न परत एकदा उपस्थित करून ते सोडविण्याचा प्रयत्न करतील. डी वाय एफ आय कडून त्यांनी खालील मागण्या संबंधित प्रशासनाकडे मांडण्याची विनंती करण्यात आली.

पूर्णेत रेल्वे इलेक्ट्रिक शेड,रेल्वे डेमू मेंटेनन्स शेड,रेल्वे गुड्स शेड, उभारण्यात यावा सिद्धार्थ नगर ते बुद्ध विहार पर्यंतचा प्रलंबित रेल्वे रुळावरील पूल  बांधण्यात यावा आदी मागण्या मागण्यांचे निवेदन दिले त्यावेळी जिल्हासचिव नसीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष अमन जोंधळे, तालुकाध्यक्ष सचिन नरनवरे, तालुकासदस्य प्रबुद्ध काळे  खरेदी विक्री संघ चेअरमन तथा जेष्ठ नेते बापुराव घाटोळ,मामा.पत्रकार सुशिल गायकवाड आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या