🌟चोपडा ग्रामनी फाउंडेशनतर्फे गरजूंना नववर्षाची नुतन भेट....!


🌟हिन अतिपतितांना हसविल्याचे जिवंत उदाहरण आले प्रत्ययास🌟


जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुकातील मालापूर व निमगव्हाण या गावात ग्रामनी फाउंडेशन तर्फे गरजू लोकांना नवीन वर्षानिमित्त कपडे मोफत वाटप करण्यात आले. काही गरीब व्यक्ती स्वतःला कपडे घेऊ शकत नाही. त्यांना या नवीन वर्षाच्या आधी काहीतरी भेट देऊन त्यांना हसवावे या हेतूने ग्रामनी फाउंडेशनचे चोपडा तालुकासचिव वैभव शिरसाठ यांनी पुढाकार घेतला आणि या उपक्रमाला चालना मिळाली. एकूण 245 कपडे 146 गरजू लोकांना वाटप करण्यात आले. यात लहान मुलांचे 114 कपडे, महिलांकरिता 70 साड्या, पुरुषांकरिता 52 ड्रेस आणि इतर 9 कपडे यांचा समावेश होता. 

       या उपक्रमात नामदेव बाविस्कर, वैभव शिरसाठ, गौरव बाविस्कर, सौरभ बाविस्कर, भावेश वाघ, वर्षा घाडगे, मिना सैंदाने, यांनी हिरीरीने भाग घेत कपड्यांचे वाटप केले. हे कपडे प्रल्हाद बाविस्कर, रितेश पाटील, कीर्ती अग्रवाल, पूनम गायकवाड, डॉ.लालचंद पटले, मिना सैंदाणे, गौरव महाले, वैभव शिरसाठ, भावेश वाघ, वर्षा घाडगे, सुदर्शन धजे यांनी खरेदी करून दिले होते. संपूर्ण ग्रामनी फाउण्डेशन परिवाराचे तनमनधनाचे अमूल्य असे सहकार्य यात लाभले आहे. ग्रामनी फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल शांताराम पाटील यांनी सर्व सदस्यगणांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले. अशी समाजाच्या हिताची अनेक कार्ये आमच्या ग्रामनी टीम कडून होत राहतील अशी ग्वाहीही त्यांनी दिली. फांउडेशनच्या या उपक्रमाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे, हे विशेष! अशी माहिती आमच्या प्रेसकार्यालयास श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी अवगत करून दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या