🌟राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना शासनाने पुर्वीप्रमाणे जाहिराती द्यावे....!


🌟पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक शंकर माने यांचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन🌟

सोलापूर (दि.०५ डिसेंबर) - महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्राना उभारी मिळावी वृत्तपत्र चळवळ जिवंत राहावी तसेच छोटया वृत्त पत्राना दिलासा मिळवा मदत मिळावी म्हणून यापूर्वी महाराष्ट्र सरकार कडून राज्यातील साप्ताहिक वृत्त पत्राना 15ऑगस्ट 26 जानेवारी दिवाळी व 1 मे महाराष्ट्र कामगार दिन अश्या वर्षातून चार वेळा राज्य सरकार कडून पाच हजार रुपये प्रमाणे वीस हजार रुपयांच्या जाहिराती मिळायच्या परंतु सन 2018 पासून राज्य सरकार ने राज्यातील  सर्वच साप्ताहिक वृत्तपत्राना जाहिराती देणं बंद केले आहे सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणे जिकरीचे झाले आहे कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्राने खच खाल्ली असून अनेक संपादकाने छपाई चा खर्च परवडत नसल्याने वृत्तपत्रे कायमस्वरूपी बंद केलेली आहेत.समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून वाढता छपाई व इतर खर्च परवडत नाही त्याच बरोबर छोटया वृत्तपत्राना राजकीय व इतर जाहिराती मिळत नसल्याने अनेक वृत्तपत्रानी माना टाकल्या आहेत राज्यात अनेक वृत्तपत्र प्रामाणिक पणे सेवा म्हणून समाज जागृती चे काम करत आहेत परंतु या काळात वृत्तपत्र चालवणे म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत ठरत आहे तरी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळाव्यात म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्य सरकार कडे पाच वर्षांपासून पत्रव्यवहार व पाठपुरावा करत आहे

* राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रा च्या जाहिराती बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे :-

  राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय वाईट असून दिवाळी अंक विशेष अंक वर्धापन दिन सारख्या वृत्तपत्राशी निघडीत असलेल्या बाबी आता जवळपास  नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत  अनेक साप्ताहिक वृत्तपत्र बंद पडली आहेत त्यांना पुन्हा उभारी देण्याची  गरज  असल्याची भावना पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक शंकर माने यांनी व्यक्त केली असून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळणे बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या