🌟पालम तालुक्यातील फरकंडा येथील त्या डिग्रस बंधाराग्रस्त उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा अदा करा....!


🌟अन्यथा येत्या दोन महिन्यात पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा🌟


पालम /प्रतिनिधी

पालम : पालम तालुक्यातील फरकंडा येथील दिग्रस बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या शेत जमिनीचा उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा द्या अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पालम तहसीलदार  यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पालम तालुक्यातील मौजे फरकडा येथील शेत सर्वे नंबर १४४ मधील जास्त प्रमाणात जमिनी डिग्रस बंधारात गेल्या असून त्यातिल शेतकरी मोबदल्या पासून वंचित आहेत.त्या राहिलेल्या वंचित शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा अदा करा ह्या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पालम तसिलदाराच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोबदला तात्काळ वाटप करा ही मागणी करण्यात आली आहे मावेजा प्रश्न येत्या दोन महिन्यात  न मार्गी लागल्यास पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात नमूद करण्यात आला आहे

या निवेदनावर पत्रकार सुरक्षा समितीचे परभणी जिल्हा सरचिटणीस प्रसाद पौळ  जिल्हा उपाध्यक्ष सदानंद हत्तीआंबिरे व अदी  शेतकऱ्यांची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या