🌟राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ.....!


🌟अर्ज करण्यासाठी दि.15 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ : जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पी.पी.नेमाडे यांनी दिली माहिती🌟 

परभणी (दि.08 डिसेंबर) : पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2023-24 या वर्षासाठी राज्सस्तरीय नाविन्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार युवक,युवती व महिलांनी ऑनलाईन पध्दतीने 8 डिसेंबर, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.

क्षेत्रिय स्तरावर सध्या व्यापक प्रमाणावर सुरु असलेले वंध्यत्व निवारण शिबीर मोहीमेदरम्यान जिल्ह्यांमधून मुदतवाढ देणे विषयी दुरध्वनीद्वारे विचारणा करण्यात येत होती.  त्यानुषंगाने आयुक्त पशुसंवर्धन यांनी सदर योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना अर्ज भरता यावेत  यासाठी  सन 2023-24  या वर्षासाठी सदर नाविन्यपुर्ण योजना व जिल्हा वार्षिक योजनेस अर्ज करण्यासाठी दिनांक  15 डिसेंबर, 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पी.पी.नेमाडे कळविले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या