🌟नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून बीव्हीजी लिमिटेड पुणे या कंपनीकडून अन्यायकारक वसूली....!


 🌟दिपावली सनानिमित्त बोनस व पगारवाढीच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन करणे कर्मचाऱ्यांच्या आले मुळावर🌟 


नांदेड : - नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून बीव्हीजी लिमिटेड पुणे या कंपनीकडून अन्यायकारक वसूली केली जात असून दिपावली सनानिमित्त बोनस व पगारवाढीच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन करणे कर्मचाऱ्यांच्या मुळावर आले असून गुरुद्वारा बोर्ड अंतर्गत येणारे यात्री निवास व परिसराचे बाह्य स्त्रोत अंतर्गत १३० कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस व पगार वाढ करण्याच्या मागणीसाठी दि.०८ नोव्हेंबर २०२३ रोजी काम बंद आंदोलन केले होते या संदर्भात नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाने कंत्राटदार कंपनी असलेल्या बीव्हीजी लिमिटेड पुणे या कंपनीवर दंडात्मक कारवाई करीत कंपनीला कर्मचाऱ्यांनी दि.०८ नोव्हेंबर व दि.०९ नोव्हेंबर २०२३ या दोन दिवस कामबंद आंदोलन केल्यामुळे ०१ लाख ०२ हजार ५९२ रपयें दंड आकारण्या संदर्भात दि.२४ नोव्हेंबर २०२३ रोजी लेखी आदेश जारी केले परंतु कर्मचाऱ्यांचे दुर्दैवच म्हणावें लागेल की दिपावली सनातच बोनस व पगारवाढीसाठी लोकशाही मार्गाने कामबंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्यायीक मागण्या मान्य करण्याऐवजी बीव्हीजी लिमिटेड पुणे यांनी गुरुद्वारा बोर्डाने आकारलेला दंड संबंधित कर्मचाऱ्यांकडूनच वसूली करण्यास सुरुवात केली असून यात हाऊस किपींग कर्मचाऱ्यांच्या पगारातून दिड दिवसाचे ४००/-रुपयें तर सुपरवाईजर,इलेक्ट्रीशन,प्लंबर,कारपेंटर आदी कर्मचाऱ्यांचा पगारातून दिड दिवसाचे ५४९/-रुपयांची अन्यायकारक कपात केली जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषासह भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.


दिपावली सनानिमित्त बोनससह पगारवाढ करण्याची जवाबदारी बीव्हीजी लिमिटेड पुणे या कंपनीची होती सदरील कामबंद आंदोलन संबंधित १३० कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या विरोधात केले होते परंतु संबंधित कंपनीने कर्मचाऱ्यांच्या न्यायीक मागण्या मान्य करण्याऐवजी उलट नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाने कंपनीला लावलेला ०१ लाख ०२ हजार ५४९ रुपयांचा दंड भरण्यासाठी देखील कर्मचाऱ्यांच्या खिशालाच कात्री लावण्याचे धोरण अवलंबल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.....


 ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या