🌟पुर्णा नगर परिषदेच्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची तक्रार थेट नगर प्रशासन विभागाच्या संचालकांकडे.....!



🌟संगणक अभियंत्याची नगर अभियंता पदावर बेकायदेशीर नियुक्ती करुन भ्रष्टाचाराला प्रोत्साहन ?🌟


🌟मुख्याधिकारी/संगणक अभियंत्यावर गुन्हें दाखल करण्याची रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांची मागणी🌟 


पुर्णा (दि.०९ डिसेंबर) - पुर्णा नगर परिषदचे प्रशासक व मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी बांधकामाचे ज्ञान नसलेले संगणक अभियंता सिद्धार्थ गायकवाड यांच्याकडे नियमबाह्य पद्धतीने नगर अभियंता म्हणून बांधकाम विभागाचा चार्ज देऊन शहरातील विविध भागात झालेल्या व होत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या सिमेंट रोड/सिमेंट नाल्यांसह बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शहरातील बांधकामे ही निकृष्ट केल्याबाबत चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करून योग्य कार्यवाही करण्यात यावी तसेच संगणक अभियंता सिद्धार्थ गायकवाड यांची नियुक्ती करणारे प्रशासक व मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्यासह सिद्धार्थ गायकवाड यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी दि.०८ डिसेंबर २०२३ रोजी एका निवेदनाद्वारे रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्य नगर परिषद प्रशासन विभागाचे संचालकांकडे केली असून यापुर्वी देखील त्यांनी अश्या स्वरूपाची दि.०९ ऑक्टोंबर २०२३ रोजी केली होती या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी पुन्हा एकदा नगर परिषद प्रशासन विभागाच्या संचालकांकडे तक्रार दिल्याने संचालक यावर का कारवाई करतात याकडे जनसामांन्यांचे लक्ष लागले आहे.


नगर परिषद प्रशासन विभागाच्या संचालकांकडे तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की परभणी जिल्ह्यातील पुर्णा नगर परिषदचे  प्रशासक व मुख्याधिकारी यांनी नगर परिषदे कडे बांधकाम अभियंता नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन बांधकामाचे ज्ञान नसलेले नगर परिषदेचे संगणक अभियंता सिद्धार्थ गायकवाड यांच्याकडे नियमबाह्य पद्धतीने नगर अभियंता बांधकाम विभागाचा चार्ज (प्रभारी पदभार) देऊन शहरात मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकास निधीतून सिमेंट रोड/सिमेंट नाल्यांसह विविध विकासात्मक बांधकामे करण्यात आली आहेत नियमबाह्य प्रभारी नगर अभियंता सिद्धार्थ गायकवाड हे संगणकाचे अभियंता असल्यामुळे त्यांना बांधकाम सिविल अभियंता म्हणून त्यांच्याकडे कोणताही अनुभव नाही व त्यांची शैक्षणिक पात्रता नसून देखील हेतू पुरस्सर प्रशासक व मुख्याधिकारी पौळ यांनी बोगस बिले काढण्यासाठी सिद्धार्थ गायकवाड यांची बांधकाम अभियंता म्हणून नियुक्ती करून गुत्तेदारांनी बोगस कामे केलेल्या सि.सि.रोड व सि.सि. नाली बांधकामाची करोडो रुपयाची एमबी करून देयके सिद्धार्थ गायकवाड यांच्या स्वाक्षरीने पास करून घेऊन काढण्यात आली असून ह्या प्रत्येक बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे यासंदर्भा पत्राद्वारे आपणास कळवून दोन महिने झाले तरी आपले कार्यालयाकडून संबंधित प्रकरणाकडे हेतू पुरस्सर दुर्लक्ष केल्याचे दिसुन आले असून आपल्या कार्यालयाकडून देखील नगर परिषदेचे प्रशासक व  मुख्याधिकारी पौळ यांची पाठराखन केल्याचे दिसुन येत असल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.


    संचालक नगर परिषद प्रशासन विभाग यांना देण्यात आलेल्या अर्जात पुढे असेही म्हटले आहे की नगर परिषदेने प्रशासकाच्या कालावधीमध्ये किती बांधकामे व किती विकासकामे केली आहेत याची हेड निहाय चौकशी करावी व प्रत्येक हेड निहाय कामे किती केली याची चौकशी पंधरा दिवसात करून दोषीवर गुन्हे दाखल करून योग्य कार्यवाही करावी अन्यथा आपण पंधरा दिवसात चौकशी व कार्यवाही न केल्यास आपणा विरुद्ध "आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल याची नोंद घेऊन त्वरित दोषींवर कार्यवाही करावी नगर परिषद प्रशासन विभागाच्या संचालकांना दिलेल्या तक्रार अर्जावर (निवेदन)‌ रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांची स्वाक्षरी आहे......



                            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या