🌟राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी....!


🌟अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तहसिलदार माधवराव बोथीकर यांना देण्यात आले निवेदन🌟  

पुर्णा (दि.२२ डिसेंबर) :- सुवर्ण  अमृत महोत्सव वर्षानिमित्त पूर्णा तालुक्यात राष्ट्रीय ग्राहक दिन जागरण पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात यावे अशी मागणी आज दि. २२ डिसेंबर रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत परिषद च्या वतीने तहसीलदार माधवराव बोथीकर यांना एक निवेदन देऊन करण्यात आली आहे                प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 24 डिसेंबर हा ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक जागर पंधरवाडा 15 १५डिसेंबर ते ३१ डिसेंबर यादरम्यान साजरा करण्यात यावा यासाठी ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका आशावर कर व संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात याव्यात ग्राहक दिन साजरा करण्याच्या संबंधी केलेल्या  नियोजनात शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना ग्राहकांना आवश्यक असलेली सर्व माहिती  यामध्ये समावेश असावा यासाठी कॉलेज शाळा वस्त्या उपवस्त्या ग्रामीण भागातील छोटी मोठी खेडेगावी अशा सर्व ठिकाणी ग्राहक जागरणाचे कार्य करणाऱ्या अनुषंगाने नियोजन करण्यात यावी यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तसेच ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पटनाट्य निबंध स्पर्धा महिला मंडळ विविध स्पर्धा शेतकरी मेळाव्याचे आशा उपक्रमांद्वारे व्यापक जनसंपर्क करून ग्राहक जागरणाचे कार्य करण्यासाठी नियोजन करण्यात यावे ग्राहक जागरण पंधरवड्यामध्ये नव्याने असलेला ग्राहक संरक्षण कायदा  अन्य सुरक्षेच्या बाबतीत विविध माहिती ग्राहकांना पुरविणे नव्याने आलेल्या तंत्रामुळे ग्राहकांच्या अडचणीतील झालेली ऑनलाईन व त्यातील फसवणुकीपासून कसे सावधान रहावे या संबंधित माहिती दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या खरेदी संबंधी विविध कायद्याची माहिती वैद्य मापन शास्त्र संबंधिच्या मूलभूत अधिकाऱ्यांची माहिती इत्यादी संबंधित जागरण उपक्रमामध्ये समावेश असावा याप्रमाणे तालुक्यातील ग्राहक दिन जागरण पंधरवाडा साजरा करण्यात या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे  अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे त्यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जनार्दन आवरगंड शिवाजी शिराळे सचिन सोनकांबळे सुशिल गायकवाड विजय सोनवणे कृष्णा काळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्राहक पंचायत सदस्य उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या