🌟पुर्णा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदावर दिगंबर कऱ्हाळे यांची निवड....!


🌟राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान🌟 

पुर्णा (दि.२६ डिसेंबर) - परभणी जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर कऱ्हाळे यांची पुर्णा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.

परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन दिगंबर कऱ्हाळे यांची तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे दत्तराव कऱ्हाळे कुंडलिक कऱ्हाळे नरहरी कदम प्रकाश कऱ्हाळे आदींनी अभिनंदन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या