🌟मानवविकास सायकल घोटाळा प्रकरणी चौकशी तात्काळ पूर्ण करून दोषींवर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करा....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी🌟


परभणी - जिल्हा नियोजन समिती मानव विकास अंतर्गत ९ वी ते १२ वी तील गोरगरीब मुलींना मोफत सायकल वाटप योजना राबविली जाते. यासाठी प्रति लाभार्थी ५०००/- रुपये प्रमाणे जिल्हातील ८ हजार ६९ विध्यार्थिनीसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये ४ कोटी ३ लाख ४५ हजार असा निधी जिल्हा नियोजन समिती मार्फत तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी परभणी यांच्याकडे वर्ग करीत असतांना त्यावेळी देण्यात आलेली प्रशासकीय मंजूरी व निधी वितरण आदेशातील नियमा प्रमाणे सायकलीची रक्कम संबधीत लाभार्थी विद्यार्थीनीच्या वैयक्तिक बँक खात्यावरती वर्ग करावेत असा नियम असतांना ही तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी हि रक्कम लाभार्थी विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर जमा न  करता ही रक्कम शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग केली. पंरतू अनेक मुख्याध्यापकांनी संबधीत रक्कम लाभार्थी विद्याथ्र्यांनीच्या खात्यावर वर्गच केली नाही. त्यामुळे मोफत सायकल योजनेपासून अनेक विद्यार्थीनी वंचीत आहे. हि अत्यंत गंभीर बाब आहे.

या बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये या कोटयावधी घोटाळयाच्या चौकशीसाठी शिक्षणाधिकारी श्री. संजय ससाणे यांच्या अध्यक्षेतेखाली ३ सदस्यीय समिती स्थापन केली. परंतू या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या चौकशी समिती अधिकाऱ्यांना माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकारी सहकार्य करत नसून चौकशी संदर्भात कागदपत्र चौकशी समितीस दिली जात नसल्याने चौकशीचे काम थांबलेले आहे.

जिल्हाधिकारी हे  जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात या नात्याने  जिल्हा नियोजन समितीच्या मानव विकास अंतर्गत असलेल्या निधीच्या गैरव्यवहाराची चौकशी करून कार्यवाही करणे हि जिल्हाधिकारी यांची जबाबदारी असते त्या नुसार मानव विकास अंतर्गत मुलींसाठी असलेल्या मोफत सायकल वाटप योजनेतील कोटयावधी रक्कमेच्या गैर व्यवहारा प्रकरणी तुर्त थाबलेली चौकशी तात्काळ पुर्ण करून या प्रकरणा मध्ये दोषी असलेले तात्कालीन माध्यमिक शिक्षणधिकारी माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी व संबधीत मुख्याध्यापक यांच्यावर शासकीय रक्कमेचा अपहार प्रकरणी गुन्हा नोंदवावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या