🌟जंग-ए-अजित न्युज - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला शिंदे-भाजपचं मोर्चाने उत्तर,धारावीसाठी थेट 'मातोश्री'वर मोर्चा काढणार🌟

* लंडन दौऱ्यापेक्षा राज्याचा दौरा चांगला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल ; दीड वर्षात शेतकऱ्यांना 44 हजार 278 कोटींची मदत केल्याचा दावा

* बहुमताच्या आधारावर पक्षावर दावा ठोकता येणार नाही, ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, आमदार अपात्रतेची सुनावणी अंतिम टप्प्यात

* दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताच्या संबंधांवरुन आजही अधिवेशनात खडाजंगी, सलीम कुत्ता कधीच मेलाय,काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा ; तर सलीम कुत्ता अजूनही येरवड्याच्या अंडा सेलमध्ये, पोलीस रेकॉर्डनुसार 1998 मध्ये मारला गेलेल्या व्यक्तीचं नाव सलीम कुर्ला 

* एकनाथ खडसेंच्या डोक्यात बिघाड, पायात चप्पलही घालायला पैसे राहणार नाहीत, म्हणून माझ्यावर आरोप ; 'सलीम कुत्ता' वरून गिरीश महाजनांचे उत्तर

* उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला शिंदे-भाजपचं मोर्चाने उत्तर,धारावीसाठी थेट 'मातोश्री'वर मोर्चा काढणार

* अदानीप्रकरणात राज ठाकरेंकडून सेटलमेंटचे आरोप,अदानींना बोलल्यावर चमचे वाजू लागले, उद्धव ठाकरेंचं  उत्तर

* 'ज्या प्रकरणात काहीच पुरावे नाहीत, त्यावर एसआयटी लावली जाते', दिशा सालियन प्रकरणात SIT चौकशीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

* तुम्ही माझं काय बघितलंय? मी अजून म्हातारा झालो नाही, लय भारी लोकांना सरळ करण्याची माझ्यात ताकद, पुण्यात वयावरुन बोलणाऱ्यांना शरद पवारांचं उत्तर 

* लोकसभेतील 31,राज्यसभेतील 34 खासदार निलंबित,दोन्ही सभागृहात संसद सुरक्षा प्रश्नावरुन विरोधकांचा गदारोळ,अध्यक्ष आणि सभापतींकडून मोठी कारवाई

* आईकडे कुणबी प्रमाणपत्र असल्यास मुलालाही ओबीसीचा लाभ द्या ; मनोज जरांगेंची नवी मागणी

* भारताच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक असा 15.7 वाटा, उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर

* शिर्डीकरांसाठी चांगली बातमी, 19 वर्षानंतर जुनी दर्शन रांग हटवण्याचं काम सुरू

* राजकीय पक्षांना जमलं नाही, संघटनांना जमलं नाही, ते यंदा असंघटित महिला कामगारांनी करून दाखवलं, नागपुरात विराट मोर्चा

* ‘पांढरे सोने ' (कापूस ) काळवंडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत! क्विटंलला 2 ते 3 हजार रुपयांची घसरण

* साई सुदर्शन पुढील 15 वर्षे टीम इंडियासाठी खेळणार! इरफान पठाण या माजी क्रिकेटपटूनं केलं भाकीत

*"जब दो जिगरी दोस्त कट्टर दुश्मन बन गए"; प्रभासच्या 'सालार'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

* अंमली पदार्थांविरोधात प्रशासनाने ऍक्शन मोडवर काम करावं,मुख्यमंत्री धामी यांचे आदेश

✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या