🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या...….!


🌟देशात अघोषित आणीबाणी आहे,आम्ही दिल्लीत अनुभव घेतो आहे,खा.सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका🌟

* तयारीला लागा, 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण ; मनोज जरांगेंची बीडच्या सभेत मोठी घोषणा

* मनोज जरागेंच्या स्मरणशक्तीत गडबड,मी असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही ; छगन भुजबळांचा पलटवार

* सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारलीय, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांचीच इच्छा, संयम राखावा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

* देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएमवर नको ; ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची मागणी

*मोदी सरकार भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही,मुजोर बजरंग पुनियाचा तीव्र निषेध,अतुल भातखळकरांची टीका

*एसटी अशी धावली, थेट सूत गिरणीत घुसली,जळगावात 65 प्रवासी थोडक्यात वाचले, सीसीटीव्हीत थरार कैद

* अडीच वर्षाची मुलगी खाडीत बुडाली, वाचवण्यासाठी पाण्यात गेलेले वडीलही बुडाले; डोंबिवलीतील धक्कादायक घटना*

* देशात अघोषित आणीबाणी आहे,आम्ही दिल्लीत अनुभव घेतो आहे, खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका

* खासदार सुप्रिया सुळे यांच्या निलंबनावर  उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कुठल्या तरी नियमांचा भंग झाल्यास त्याप्रमाणे कारवाई केली जाते

* शनिशिंगणापूरचे कर्मचारी 25 डिसेंबरपासून बेमुदत संपावर, सुट्ट्यांच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची होणार तारांबळ

* स्वारगेट ते कात्रज मेट्रो धावणार? केंद्राच्या मान्यतेची प्रतीक्षा; उपमुख्यमंत्री अजित पवार निधी देणार

* एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल

* मराठा आरक्षणाचा निर्णय 24 डिसेंबरपर्यंत होणे शक्य नाही; भाजप  सुभाष देशमुख यांचं मोठं वक्तव्य

* कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात बदल, ऋतुराज गायकवाडच्या जागी युवा खेळाडू अभिमन्यू ईश्वरनला  मिळणार संधी

* महिला कैदी बनली रेडीओ जॉकी! आता कारागृहात होणार महिला कैद्यांचं मनोरंजन; भायखळा जेलचा विशेष उपक्रम

* कर्नाटकमधील हिजाबवरील बंदी हटवणार, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची मोठी घोषणा

* नवीन मर्सिडीज जीएलएस फेसलिफ्ट 8 जानेवारी 2024 या दिवशी होणार लाँच

* कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला; मजुरी वाढल्याने शेतकऱ्याच्या खिशाला अधिक झळ.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या