🌟पुर्णेतील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची केंद्रीय महोत्सवासाठी निवड....!


🌟नाशिक येथे दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या केंद्रीय क्रीडा महोत्सवासाठी निवड🌟 

पुर्णा (दि.१२ डिसेंबर) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी सगुणा मारोतराव देसाई व शिवराज सुभाष हिवरे यांची नाशिक येथे दिनांक १४ व १५  डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या केंद्रीय क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  विभागीय केंद्र नांदेड आयोजित क्रीडा महोत्सव २०२३ नुकताच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या क्रीडा मैदानावर पार पडला. या क्रीडा स्पर्धेत स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्राचे विद्यार्थिनी सगुणा मारोतराव देसाई हिने 200 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला तर शिवराज सुभाष हिवरे या विद्यार्थ्याची कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. या दोन्हीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष गुलाबराव कदम, प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार,केंद्र संयोजक प्रा.डॉ. प्रभाकर किर्तनकार,कर्मचारी गिरधारी कदम, यादव कल्लाळीकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या