🌟क्रिडा विद्यापीठासाठी समितीची स्थापना : अभिप्राय,सुचना पाठविण्याचे आवाहन.....!


🌟कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन🌟

परभणी (दि.13 डिसेंबर) : छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या क्रीडा विद्यापीठासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय तर्फे कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.


छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा विद्यापीठाचा अधिनियम तयार करणे, क्रीडा विद्यापीठ अनुषंगीक बाबींची शिफारस करणे, क्रीडा विद्यापीठ अंतर्गत अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शिफारस करणे अशी समितीची कार्यकक्षा असणार आहे. अधिनियम तयार करतांना क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ, क्रीडा संस्था, एकविध क्रीडा संघटना, खेळाडु, प्रशिक्षक यांचे अभिप्राय व सुचना घेणे आवश्यक असणार आहे. यासाठी अभिप्राय व सुचना मो. क्र. 6595605511 (8810911.001) यावर दि. 20 डिसेंबर, 2023 पर्यंत पाठविण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे. क्रीडा विषयक कामगिरी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन नोकरीच्या संधी, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, राज्यात क्रीडा प्रशिक्षक, खेळाडु निर्माण व्हावे हा उद्देश ठेवून शासनातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन केले जात असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या