🌟श्रीमद्भभगवत गीता व भागवत अंगिकारल्यास जीवनाच सार्थक - हभप.रघुराज शास्त्री धारूरकर


🌟हिंगोली येथील शिवाजी नगर भागातील श्री दत्त मंदिरात आयोजित किर्तना प्रसंगी ते बोलत होते🌟                                 

हिंगोली (दि.२५ डिसेंबर) :- श्रीमद्भभगवत गीता आणि भागवत ह्या पवित्र ग्रंथाचं वाचन,श्रवण,केल्यास खऱ्या अर्थाने जीवनाच सार्थक होते त्यासाठी सर्वांनी हे अंगिकाराव असे प्रतिपादन हभप.रघुराज शास्त्री धारूरकर ह्यांनी काढले.

हिंगोली येथील शिवाजी नगर भागातील श्री दत्त मंदिरात आयोजित कीर्तन करताना ते बोलत होते.आपल्या रसाळ वाणीतून त्यांनी आपल्या भारतात जी अध्यात्मिक परंपरा आहे तशी जगात कुठेही नाही त्यामुळे अवघ्या जगातील लोक आपल्या भारतीय परंपरेनुसार जगण्याचा प्रयत्न करीत असून अनेक धर्मग्रंथांच अध्ययन करून संत परंपरेचा अभ्यास करताना दिसत असल्याने आपली  संत परंपरा आपल धर्मशास्त्र,आपली धर्म संपदा विश्वात सर्व श्रेष्ठ असल्याची अनुभूती जगभरात अनुभवास येत आहेअस म्हंटल. निव्वळ पारायण करून अथवा श्रवण करून फलश्रुती अशक्य असून ते अंगीकारणे गरजेचे आहे असे ही शास्त्री म्हणाले.भक्त आणि देवाच एकरूपत्व अनुभवायचं असेल तर आपल्या संतांनी दिलेली शिकवण कृतीत आणल्यास दिव्यात्वाची अनुभूती होईल असंही शास्त्री म्हणाले.संत तुकाराम, संत नामदेव,संत नरहरी सोनार,संत रामदासस्वामी,संत चोखामेळा संत सावता माळी,संत विसोबा खेचर आदी संतांच्या शिकवणी ची व तत्वज्ञानाची माहिती देवून व संगीत साथीने अभंग गावून रघुराज शास्त्री ह्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.संतांनी आपल्या भक्तीतून देवाला सुद्धा त्यांच्या ठायी जावून साक्षात्कार घडवण्या साठी भाग पाडले.ही शक्ती ह्या भक्ती मधे असून आपली संस्कृती विसरून आपण पाशचात्य  संस्कृती कडे जात असल्याने आपली दैना होत आहे.  भारतीय परंपरा,संत परंपरा,आपल धर्मशास्त्र,आणि आपला अध्यात्मिक वारसा अंगीकारा म्हणजे आपण सुखी होवून इतरांनाही सुखी करू शकू आणि भारताला विश्र्वगुरू म्हणून खिताब मिळवून देवू शकू असही म्हंटल.हिंगोली जिल्हा तर खूप भाग्यशाली आहे.कारण संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचं जन्मस्थान हिंगोली जिल्ह्यातील असून नामदेवांनी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदिप लावू जगी म्हणत वारकरी संप्रदायाची पताका देशात लावली.हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ  हे द्वादश हरीहरात्मक आठवे जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग असून अश्या जिल्ह्यातील आपण नागरिक आहात हे काही थोड  थोडक नव्हे ही तुम्हा सर्वांची पुण्याई आहे हिला कॅश करा असा  गौरवपूर्ण उल्लेख करून हिंगोली जील्हावासिय भाग्यवंत असल्याचं म्हंटल रघुराज शास्त्री चे पिताश्री ह.भ.प.धारूरकर महाराजांनी अवघ आयुष्य कीर्तन प्रबोधन करून हसतमुखाने जनसेवा केली,त्यांची ख्याती हिंगोली जिल्ह्यासह देशभरात होती तीच परंपरा धर्म, अध्यात्म,धर्मशास्त्र ह्यांची सांगड विज्ञानाशी घालून रघुराज शास्त्री ह्यांनी कायम ठेवली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सुविख्यात कीर्तनकार,प्रबोधनकार भागवतकार,म्हणून ते सुपरिचित असल्याचं ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी म्हंटल.रघुराज शास्त्री  हे धारूर हून शेगावकडे जात असताना भक्त भाविकांच्या आग्रहास्तव काही वेळ थांबून त्यांनी कीर्तन केलं हे विशेष होय. कीर्तनात तबला संगत प्रथमेश कुलकर्णी तर पेटी वर साथ विनायक नागोराव देशपांडे ह्यांनी करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं.महसूल कॉलनी,शिवाजी नगर,आणि दत्त मंदिर परिसरातील भक्त भाविक, विश्वस्त आणि रसिक श्रोत्यांनी  शास्त्री ह्यांचा यथोचित सत्कार केला.हिंगोली येथील सुधाकर महाजन,रत्नाकर,व संदीप महाजन आणि कुटुंबीयांनी ,ज्येष्ठ समाजसेवक बंडाळे काका ह्यांनी देखील रघुराज शास्त्री ह्यांचा शाल श्रीफळ देवून सपत्नीक सत्कार केला.ह.भ.प.धारूरकर महाराजांनी ६ दशक कीर्तन, भजन,प्रवचन, व गीता आणि भागवत अश्या माध्यमातून  समाज आणि राष्ट्र सेवा केली ह्या बाबत ज्येष्ठ मंडळींनी रघुराज शास्त्री ह्यांच्या पिताश्री च्या  अमृत वाणी च्या आठवणींना उजाळा दिला.वर्षातून किमान एक वेळा तरी हिंगोली जिल्ह्यात शास्त्री ह्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्रोत्यांनी  विनंती केली असता त्यांनी होकार दिला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या