🌟परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथील ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे पत्रकारितेला समर्पितपणे वाहून घेतले ल आदर्श व्यक्तिमत्व...!


🌟गेल्या चार दशकापासून पत्रकारितेला व्रतं स्थपणे त्यांनी वाहून घेतले🌟

परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथील ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे यांना अतिशय प्रतिष्ठेचा ऑल इंडिया जर्नलिस्ट फ्रेंड्स पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला असून नांदेड येथील नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलना त दिनांक 24 डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

गेल्या चार दशकापासून पत्रकारितेला व्रतं स्थपणे त्यांनी वाहून घेतले आहे.क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळशास्त्री जांभेकर, आगरकर यांच्या तेजस्वी विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या पत्रकारितेमध्ये पहावयास  मिळते.दैनिक लोकमत मध्ये जवळपास तीन दशक त्यांनी तालुका प्रतिनिधी म्हणून कार्य केले.समाजातील शोषित पीडित वंचित शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.सज्जन व चांगल्या प्रवृत्तीचा सन्मान दांभिक भ्रष्टाचारी यांच्यावर निर्भिडपणे आसूड ओढण्याचे काम त्यांनी केले.

मंडल आयोगाचे प्रणेते देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत आदरणीय व्ही.पी सिंग नांदेड या ठिकाणी आले होते त्यावेळी त्यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.व्ही.पी. सिंग यांच्या अंतरंगाचा विलोभनीय प्रतिबिंब त्यांच्या मुलाखती मधून पहावयास मिळाले"पेड कभी फल खाते है क्या"हा त्यांचा मुलाखतीचा गाभा होता.आदरणीय व्ही.पी.सिंग यांच्या दूरदृष्टी कोनातून मंडल आयोगाचे अंमलबजावणी झाली देशामध्ये मोठ्या प्रमाणावर असणारे ओबीसी समाजाला भारतीय राज्यघटनेचे न्याय नैसर्गिक हक्क मिळाले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांच्या कार्यकाळामध्ये मध्येच मिळाला संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र सन्मानपूर्वक लावले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांना राज्यसभेवर त्यांच्यामुळे संधी मिळाली.यामुळे विजयराव यांच्या मनामध्ये आदरणीय व्ही.पी. सिंग यांच्या विषयी नेहमीच नितांत आदर भावना राहिली आहे.पूर्णा शहरांमध्ये रेल्वे संघर्ष समिती अंतरगत पूर्णा हे मराठवाड्यातील महत्त्वाच रेल्वे जंक्शन निजाम कालापासून फार मोठ वैभव या रेल्वे स्थानकाला होते मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त जागा रेल्वे विभागाची या ठिकाणी आहे.परंतु रेल्वे विभागाचे अनेक महत्त्वाचे कार्यालये येथून हेतू पुरस्कर पणे इतर ठिकाणी नेली गेली.यावर त्यांनी निर्भीडपणे लेखणी चालवली.

पूर्णा शहर हे आंबेडकरी व धम्म चळवळीचे मराठवाड्यातील प्रमुख केंद्र आहे. अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष जागतिक कीर्तीचे पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महा थे रो  पूज्य भदंत पय्यावांश यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी प्रबोधनाचे धम्म जाणीव जागृतीचे कार्यक्रम सातत्याने चालत असतात त्या कार्यक्रमांना यथोचित प्रसिद्धी देण्याचं काम ते सेवाभावी वृत्तीने करत असतात.धम्माचे विशुद्ध अभ्यासू उपासक म्हणून त्यांच्या कडे बघितल्या जाते.त्यांच्या सुविद्य सहचारिणी आदर्श धम्म उपासिका सुनीता ताई यांच्या सोबत त्यांनी बुद्ध धम्म दर्शन पर्यटन व श्रीलंका थायलंड या बौद्ध देशांना भदंत डॉ.उपगुप्त महा थेरो यांच्या मार्गदर्शन खाली निघणाऱ्या धम्म सहली मध्ये जाऊन धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

ते ऐक आदर्श संस्कारक्षम पिता आहेत.त्यांचे सुपुत्र डॉ. विनय हे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडीक सर्जन आहेत.हिंगोली येथे  वैद्यकीय अधिकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.डॉ.विनय यांच्या पत्नी डॉ.प्रतिभा ह्या सुद्धा एमबीबीएस एमडी असुंन त्या सुद्धा हिंगोली या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहेत सुकन्या डॉ. प्राची ह्या डेंटिस्ट आहेत.संपूर्ण कुटुंब सन्मार्गावर आहे विजयराव बगा टे हे पूर्णा येथील कैलासवासी विठ्ठलराव मोरे मुक बधीर  विद्यालयावर मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.तीन दशकापेक्षा जास्त त्या ठिकाणी त्यांनी कर्तव्यदक्षपणे सेवा केली.मागील वर्षी ते सेवानिवृत्त झाले.

एक आदर्श संस्कार क्षम कुटुंब प्रमुख कर्तव्यदक्ष विद्यार्थी प्रिय शिक्षक मुख्याध्यापक सामाजिक बांधिलकी जपणारा निरपेक्ष पत्रकार आंबेडकरी व धम्म चळवळीतील निष्ठावंत कृतिशील अनुयायी म्हणून त्यांचं कार्य सुपरिचित आहे.त्यांना मिळालेल्या या सन्मानाच्या पुरस्काराबद्दल अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो  भदंत पयावांश व सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.......

शुभेच्छुक

श्रीकांत हिवाळे सर

अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका पूर्णा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या