🌟नांदेड येथील प्रभात नगरचे माजी नगरसेवक एन.यू.सदावर्ते यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभा संपन्न....!


🌟अभिवादन सभेत त्यांच्या पत्नी भारतीबाई सदावर्ते यांचा देह दानाचा संकल्प🌟नांदेड : फुले शाहू आंबेडकर चळवळीचे झुंजार जेष्ठ नेते,प्रभात नगरचे माजी नगरसेवक व प्रभात नगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे माजी चेअरमेन एन.यु.सदावर्ते यांची पुण्यतिथी  प्रभात नगर येथील भैय्यासाहेब आंबेडकर सभागृह  येथे संपन्न झाली. यावेळी प्रभात नगर मधील ज्येष्ठ नेते, उपासक उपसिका आणि आंबेडकरी चळवळीतील त्यांचे सहकारी उपस्थित होते.


त्यांच्या देहांतानंतर त्यांनी आपला देह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दान दिला. त्यांच्या या कार्याचा आणि  चळवळीतील त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ आणि सहकारी मित्रांसह बालकांद्वारे अभिवादन करण्यात आले या अभिवादन सभेतून भदंत संघप्रिया यांच्याद्वारे धम्मदेसना देण्यात आली. धम्मदेसनेपूर्वी ज्येष्ठ समाजसेविका आणि त्यांच्या पत्नी भारतीबाई सदावर्ते यांनी आपल्या पतीचा देहदानाच्या संकल्पाचा आदर्श घेऊन  यांनी सुद्धा देहदान करण्याचा संकल्प केला आहे.

       सद्य स्थितीत विविध आरोग्य संशोधनासाठी आवश्यक बॉडी ची कमतरता आणि अवयवांची उणीव लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी देहदानाचा संकल्प करावा. ही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एन.यु. सदावर्ते यांना खरी श्रद्धांजली ठरेल.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या